ओसरगाव टोलनाक्यावर शिवसेनेची निदर्शने, टोलमाफी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 02:15 PM2022-07-02T14:15:13+5:302022-07-02T14:16:30+5:30

ओसरगाव टोलनाका सूरु करण्याच्या हालचाली परत सुरु झाल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला

Shiv Sena protests on Osargaon toll plaza, warning of intense agitation if toll exemption is not given | ओसरगाव टोलनाक्यावर शिवसेनेची निदर्शने, टोलमाफी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

ओसरगाव टोलनाक्यावर शिवसेनेची निदर्शने, टोलमाफी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Next

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोलमाफी मिळेपर्यंत ओसरगाव येथील टोलनाका सुरु करण्यास शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. ओसरगाव टोलनाका सूरु करण्याच्या हालचाली परत सुरु झाल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी आज, शनिवारी पुन्हा ओसरगाव टोलनाक्यावर धडक दिली. तसेच टोलमाफीसाठी जोरदार निदर्शने केली.

यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण परियोजना कार्यक्षेत्र कोल्हापूरचे अधिकारी पी. डी. पंदरकर  यांच्याशी आमदार वैभव नाईक व संदेश पारकर यांनी दूरध्वनीवर संवाद साधला. तसेच जोपर्यंत सिंधुदुर्गवासियांना टोलमाफी जाहीर केली जात नाही तसेच महामार्ग संबंधित नागरिकांचे प्रश्न व इतर समस्या मार्गी लागत नाहीत तोपर्यंत टोलनाका सुरु करण्यात येऊ नये. अन्यथा होणाऱ्या परिणामांना आपणास सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, रामदास विखाळे, राजू राठोड,  युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena protests on Osargaon toll plaza, warning of intense agitation if toll exemption is not given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.