शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कणकवलीत शिवसेनेकडून भाजप सरकारचा निषेध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 20:29 IST

shiv sena, protests, BJP government, kankavali, shindhedurg news निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचार थांबतील अशी अपेक्षा होती , पण भाजपा सरकार महिलांवरील हा अत्याचार थांबवू शकले नाही. असा आरोप करीत शिवसेनेकडून गुरुवारी भाजपा प्रणित केंद्रशासनाचा कणकवली येथे निदर्शने करीत निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्ह्यात मृत्यूसत्र सुरूच, युवती अत्याचारप्रकरणी योग्य भूमीका न घेतल्याचा आरोप कणकवली येथे जोरदार घोषणाबाजी, निदर्शने

कणकवली : निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचार थांबतील अशी अपेक्षा होती , पण भाजपा सरकार महिलांवरील हा अत्याचार थांबवू शकले नाही. असा आरोप करीत शिवसेनेकडून गुरुवारी भाजपा प्रणित केंद्रशासनाचा कणकवली येथे निदर्शने करीत निषेध करण्यात आला.

केंद्रात व उत्तरप्रदेशमध्ये भाजप सरकार असून तेथे महिला सुरक्षित नाहीत . उत्तरप्रदेश येथे एका युवतीवर सामुदायिक अत्याचार झाल्यावर कुटुंबियांना विश्वासात न घेता पोलिसांनीच परस्पर अंत्यसंस्कार केले . या घटनेनंतरही तीच्या कुटूंबियांची परवड थांबली नाही .कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत- पालव , वैदेही गुडेकर , माधवी दळवी , नगरसेविका मानसी मुंज , उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये ,सुजीत जाधव, नगरसेवक सुशांत नाईक , नगरसेवक कन्हैया पारकर , युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू , माजी नगरसेवक भूषण परुळेकर , योगेश मुंज , ललित घाडीगांवकर , वैभव मालंडकर, रमेश चव्हाण , राजू राणे , राजन म्हाडगुत , विलास गुडेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते .यावेळी नीलम सावंत- पालव म्हणाल्या, महिलांवर होणाऱ्या सामुदायिक अत्याचाराच्या घटना येत्या काळात थांबवण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र, भाजपाच्या केंद्र व उत्तर प्रदेशच्या राज्य शासनाकडून तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे त्या शासनाचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो. असेही त्या यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीBJPभाजपा