शिवसेनेची निशाणी सहजासहजी जाऊ देणार नाही अन् ती जाणारही नाही- वैभव नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2022 14:45 IST2022-09-08T15:42:26+5:302022-09-08T14:45:02+5:30
भारतीय जनता पार्टीला शिवसेनेची इतकी भीती वाटतेय की शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याचे प्रयत्न सुरू करत आहेत. म

शिवसेनेची निशाणी सहजासहजी जाऊ देणार नाही अन् ती जाणारही नाही- वैभव नाईक
भारतीय जनता पार्टीला शिवसेनेची इतकी भीती वाटतेय की, शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याचे प्रयत्न सुरू करत आहेत. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी मतदार शिवसेनेच्या पाठीशी राहिला, म्हणून शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण आहे आणि ती सहसासहजी जाऊ देणार नाही आणि जाणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
दिल्लीतून येऊन कोणीही आमचा पक्ष जर कोणी संपविण्याचा प्रयत्न करत असेल, मराठी माणसाला संपविण्याचा प्रयत्न करत असेल, महाराष्ट्राची अस्मिता संपविण्याचा प्रयत्न करत असेल, तर मात्र महाराष्ट्रातील जनता प्रखरपणे या गोष्टीला विरोध करेल, असंही वैभव नाईक यांनी सांगितलं.