शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

रिफायनरी प्रकल्प गेल्यास शिवसेना नेत्यांना कदापी माफी नाही : जठार यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 8:04 PM

nanar refinery project Pramod Jathar Sindhudurg : शिवसेनेच्या विरोधामुळे नाणारमधून रिफायनरीने गाशा गुंडाळला आहे. तर आता याच तालुक्यातील बारसू - सोलगाव येथील जागेसाठी रिफायनरी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यातही अपयश आल्यास ही कंपनी महाराष्ट्राबाहेर जाणार आहे. तसे झाल्यास खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांची कोकणच्या राजकारणातून कायमची हकालपट्टी झालीच म्हणून समजा, त्यांना कदापि माफी नाही, असा इशारा भाजप नेते प्रमोद जठार यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्प गेल्यास शिवसेना नेत्यांना कदापी माफी नाही : जठार यांचा इशारा प्रमोद जठार यांचा इशारा : विनायक राऊत, राजन साळवींनी केला कडवा विरोध

कणकवली : शिवसेनेच्या विरोधामुळे नाणारमधून रिफायनरीने गाशा गुंडाळला आहे. तर आता याच तालुक्यातील बारसू - सोलगाव येथील जागेसाठी रिफायनरी कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यातही अपयश आल्यास ही कंपनी महाराष्ट्राबाहेर जाणार आहे. तसे झाल्यास खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांची कोकणच्या राजकारणातून कायमची हकालपट्टी झालीच म्हणून समजा, त्यांना कदापि माफी नाही, असा इशारा भाजप नेते प्रमोद जठार यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे अधिक माहिती देताना प्रमोद जठार म्हणाले, नाणारमधील प्रस्तावित असलेल्या १४ गावांतील तब्बल साडेआठ हजार एकरांचे जमीन मालक शेतकरी व भूधारकांनी त्या भागात रिफायनरी व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न करून शासनापर्यंत लेखी संमतीपत्रे पोहोचवली होती. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख असताना जाहीर केलेली नाणार विरोधाची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवल्याने अखेर रत्नागिरी रिफायनरी कंपनीने नाणारमधून काढता पाय घेतला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी नाणार येथे रिफायनरी प्रकल्पाला कडवा विरोध केला होता.अकरा हजार एकरात एकही गाव, वाडीचे विस्थापन नाहीआता नाणारनंतर राजापूर तालुक्यातील शहरानजीकच्या बारसू व सोलगाव या ठिकाणच्या जागेत रिफायनरी कंपनी चाचपणी करत आहे. याठिकाणी शिवसेनेच्याच उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसी अंतर्गत बारसू, सोलगाव वरचीवाडी याठिकाणी २३०० एकरासाठी अधिसूचना काढली आहे. तर त्या परिसरातील ११ हजार ५०० एकर जमीन उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या साडेअकरा हजार एकरात एकही गाव अथवा वाडीचे विस्थापन नसल्याने रिफायनरी कंपनीसाठी ही बाब लाभदायक ठरली आहे.जनताच हद्दपार करेलया भागातील बऱ्याच ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात असल्याने शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अजून तरी याठिकाणी विरोधाची भूमिका कोणी घेतली नाही, मात्र पुन्हा नाणारची री ओढली गेल्यास रिफायनरी रत्नागिरी जिल्ह्यातून गाशा गुंडाळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. तसे झाल्यास कोकणच्या राजकारणातून खासदार राऊत आणि आमदार साळवी यांना जनताच हद्दपार करेल, असा दावा प्रमोद जठार यांनी केला आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पPramod Jatharप्रमोद जठारBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग