कणकवलीतील शिवसेनेच्या नगरसेविका माही परूळेकर शिंदे गटात

By सुधीर राणे | Updated: August 29, 2022 13:26 IST2022-08-29T13:19:51+5:302022-08-29T13:26:10+5:30

शिवसेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन लवकरच होणार

Shiv Sena corporator from Kankavli Mahi Parulekar entered the Eknath Shinde faction | कणकवलीतील शिवसेनेच्या नगरसेविका माही परूळेकर शिंदे गटात

कणकवलीतील शिवसेनेच्या नगरसेविका माही परूळेकर शिंदे गटात

कणकवली: कणकवली नगरपंचायतीच्या शिवसेना नगरसेविका माही परुळेकर यांच्यासहित काही महिलांनी आज, सोमवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय आग्रे यांनी या सर्वांचे स्वागत केले.

दरम्यान, आमची शिवसेना ही अधिकृत शिवसेना आहे. आमच्या शिवसेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन लवकरच होणार आहे. या उद्घाटनाला मुख्यमंत्री यावेत, असा आमचा प्रयत्न आहे. तसेच जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व इतर पदाधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवानंतर या नियुक्त्या होतील. याच दरम्यान कार्यालयाचे उद्घाटनही होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सभापती संदेश सावंत -पटेल यांनी दिली. सर्वसामान्य जनतेचे हे सरकार असून लोककल्याणाचे काम करत असताना काहीही अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी केले.

यावेळी संजय आग्रे, संदेश सावंत-पटेल, यांच्यासहित भास्कर राणे, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, चंद्रशेखर राणे, सुनील पारकर, दामोदर सावंत, दीपक राऊत ,राजू कासले यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena corporator from Kankavli Mahi Parulekar entered the Eknath Shinde faction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.