शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 7:59 PM

kankvali, shivsena, sindhudurgews, sandeshparkar, कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तसेच नगरोत्थान योजनेमधून सन २०१८-१९ मध्ये ६ कोटी २ लाखांचा निधी देण्यात आला आहे. तर सन २०२० मध्ये ५ कोटिंचा असा तब्बल ११ कोटींचा निधी शहरासाठी देण्यात आला आहे. याशिवाय अन्य कामांसाठीही निधी देण्यात आला असून आम्ही नगरपंचायतीतील सत्तेत नसलो तरी निधी देताना कोणत्याही प्रकारचा दुजाभाव करण्यात आलेला नाही. अशी माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी येथे दिली.

ठळक मुद्देकणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध ! संदेश पारकर यांची माहिती ; दोन वर्षात दिला अकरा कोटिंचा निधी

कणकवली : कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तसेच नगरोत्थान योजनेमधून सन २०१८-१९ मध्ये ६ कोटी २ लाखांचा निधी देण्यात आला आहे. तर सन २०२० मध्ये ५ कोटिंचा असा तब्बल ११ कोटींचा निधी शहरासाठी देण्यात आला आहे. याशिवाय अन्य कामांसाठीही निधी देण्यात आला असून आम्ही नगरपंचायतीतील सत्तेत नसलो तरी निधी देताना कोणत्याही प्रकारचा दुजाभाव करण्यात आलेला नाही. अशी माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी येथे दिली.कणकवली येथील विजयभवनमध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, सुजित जाधव , राजू राठोड, ऍड. हर्षद गावडे, तेजस राणे, गुरू पेडणेकर, नगरसेविका मानसी मुंज, माही परुळेकर,साक्षी आमडोस्कर , प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते.यावेळी संदेश पारकर म्हणाले, सन २०१८- १९ मध्ये दिलेल्या निधीमध्ये क्रीडांगण आरक्षणासाठी ४ कोटी, शहरातील रस्ते व गटार साठी ३० लाख , अग्निशामक केंद्रासाठी तसेच अन्य विकासकामांसाठी १ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी शिवसेनेने दिला आहे. तर पालकमंत्री उदय सामंत , खासदार विनायक राऊत , आमदार वैभव नाईक , आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी यावर्षी ५ कोटीचा निधी देण्यात आला आहे.

त्यामध्ये श्रीधर नाईक उद्यान नूतनीकरणसाठी १ कोटी , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी व सुशोभीकरणसाठी १ कोटी तर अन्य विकासकामांसाठी ३ कोटीच्या निधीचा समावेश आहे.तसेच बस स्थानक आवारात भव्य व्यापारी संकुल निर्मितीबाबत लवकरच परिवहनमंत्री अनिल परब धोरणात्मक निर्णय घेणार आहेत. परमहंस भालचंद्र महाराज संस्थान येथे सभामंडप उभारण्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला आहे.कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना नेहमीच झुकते माप देत आहे. लवकरच या विकास कामांचे भूमिपूजन होऊन वर्षभराच्या काळात ती कामे लोकार्पणही केली जातील. महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती होत असून या वर्षातील ८ महिने कोरोना काळात गेले आहेत. उर्वरित ४ महिन्यात राज्याला विधायक दिशा देणारे विकासात्मक निर्णय ठाकरे सरकारने घेतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संवेदनशीलतेने राज्यकारभार केला आहे.जिल्हा विकासासाठीही हितावह निर्णय घेण्यात आले आहेत.कोरोनाशी सामना करताना खंबीरपणे पालकमंत्री उदय सामंत , खासदार विनायक राऊत , आमदार दीपक केसरकर , आमदार वैभव नाईक यांनी जिल्हावासीयांना साथ दिली आहे. ओरोस येथे ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात आली असून कोव्हीड -१९ च्या चाचण्याही सुरू झाल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ९६६ कोटी निधीची मान्यता देण्यात आली आहे. तसेच तत्काळ १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.गरज पडल्यास आंदोलनही करू !कणकवली शहरातील ४५ मीटरच्या आत आरओडब्ल्यू मधील जागा आणि मालमत्ता ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या मालकीची आहे. त्या जागेत असलेली अनधिकृत बांधकामे काढण्यात येणार आहेत. आम्ही सत्तेत असलो तरी जनतेच्या प्रश्नी गरज पडल्यास निश्चितच आंदोलन करण्यात येईल. महामार्गा बाबतच्या समस्या सोडविण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. असेही संदेश पारकर यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Sandesh Parkarसंदेश पारकरKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना