शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळमध्ये शिवसेना-भाजपामध्ये राडा, वैभव नाईक-भाजपा कार्यकर्ते भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 15:50 IST

आमदार वैभव नाईक यांची गाडी रोखल्याने शिवसेना-भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

कुडाळ - कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकी दरम्यान शिवसेना-भाजपामध्ये मोठा राडा झाला. आमदार वैभव नाईक यांची गाडी रोखल्याने भाजपा- शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुकी देखील झाली. यामुळे येथील वातावरण तणावपुर्ण बनले आहे.कुडाळ नगरपंचायतमध्ये आज नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. निवडणूक असल्याने नगरपंचायत मार्गावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. यावेळी काँग्रेसचे उमेदवार घेवून आमदार वैभव नाईक नगरपंचायत येथे आले. नगरपंचायत परिसरात बंदी असताना आमदार नाईक यांची गाडी नगरपंचायत कार्यालय येथे कशी काय येवु दिली? असा जाब भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिसांना विचारला. तर, पोलिस प्रशासनाच्या भुमिकेबाबत भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार वैभव नाईक यांची गाडी रोखल्याने शिवसेना-भाजपा पदाधिकार्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची होत धक्काबुकी झाली. यामुळे येथील वातावरण तंग बनले.दरम्यान पोलिस प्रशासनाने आमदार वैभव नाईक यांची गाडी तेथे न थांबविता पुढे नेण्यास सांगितले. तसेच दोन्हीही पक्षाच्या पदाधिकार्यांना पोलिसांनी बाजुला केल्यामुळे हा वाद काही काळ शमला पण वातावरण तंग बनले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळShiv SenaशिवसेनाBJPभाजपाVaibhav Naikवैभव नाईक