शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात आंबा, काजू पिकावर नवनवीन संशोधन; शरद पवार यांनी घेतली माहिती

By अनंत खं.जाधव | Updated: April 24, 2025 18:03 IST

वेगुर्ले : माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज, गुरूवारी वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी ...

वेगुर्ले : माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज, गुरूवारी वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी फळ संशोधन केंद्रातील आंबा, काजू या पिकावर नवनवीन पध्दतीने करण्यात आलेल्या संशोधनाची माहिती घेतली. विशेष करून काजू पिकांचे उत्पादन वाढविण्यात कृषी यश आले असून त्याचे सादरीकरण ही यावेळी करण्यात आले. दापोली कृषी विद्यापिठाचे कुलगुरू संजय भावे यांनी कृषी केंद्रातील नवनवीन सशोधनाची माहिती दिली त्यावर पवार यांनी समाधान व्यक्त केले.शरद पवार हे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून त्यांनी आज वेंगुर्ले कृषी संशोधन केंद्राला भेट दिली. कुलगुरू संजय भावे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उद्योगपती अवधूत तिबलो, अप्पर पोलीस अधीक्षक रूषिकेश रावले, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डाॅन्टस, प्रांताधिकारी हेमंत निकम, माजी मंत्री प्रविण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, आदिती पै प्रसाद रेगे, श्वेता कुबल आदिसह फळ संशोधन केंद्रातील प्राध्यापक उपस्थित होते.कुलगुरू भावे यांनी फळ संशोधन केंद्राकडून कशा प्रकारे संशोधन सुरू आहे याबाबतची माहिती पवार यांना दिली. यात प्रामुख्याने काजू चे उत्पादन कशा प्रकारे वाढविण्यात आले. महाराष्ट्रात कशा प्रकारे काजूचे उत्पादन घेतले जाते. १९८७ साली अवघ्या २२ हजार हेक्टर वर असलेले काजूचे उत्पादन २०२३-२४ मध्ये ते तब्बल दोन लाख हेक्टर च्या घरात जाऊन पोहचले आहे. काजूच्या वेगवेगळ्या जाती विकसित करण्यात आल्याचे सांगितले.तसेच काजू प्रमाणेच आंबा व भात शेतीच्या नवनवीन जाती विकसित करण्यात आल्या असून या सर्व प्रयोगाना चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती दिली. पवार यांनी सर्व पिकांचे सादरीकरण सुरू असतानाच भावे यांना वेगवेगळे प्रश्न विचारून त्याबद्दलची माहिती जाणून घेतली. पवार यांनी खासगी दौरा असतानाही त्यातून वेळ काढून आबा संशोधन केंद्राला भेट दिली तसेच प्रत्यक्षात केंद्रातील सर्व पिकांची माहिती जाणून घेतली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSharad Pawarशरद पवारAgriculture Sectorशेती क्षेत्र