अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 17:32 IST2017-10-14T14:42:42+5:302017-10-14T17:32:54+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल दाखल झाला आहे. देवगड तालुक्यातील कुणकवन या गावातील तीन जणांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार अधिनियम नुसार विजयदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
ठळक मुद्देविजयदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलएकजण ताब्यात, दोन फरार
देवगड, दि. १४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल दाखल झाला आहे.
देवगड तालुक्यातील कुणकवन या गावातील तीन जणांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार अधिनियम नुसार विजयदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी देवगड तालुक्यातील विजयदुर्ग पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी धाव घेतली आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर दोन संशयित आरोपी फरार आहेत.
पोलिस त्यांच्या शोध घेत असून याबाबत घटनेचा अधिक तपास विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करत आहेत.