शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

By admin | Updated: July 21, 2015 00:55 IST

प्राध्यापक निलंबित : विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या दारात आंदोलन

दापोली : येथील डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर याच महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक एस. पी. कुऱ्हेकर यांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या मुलीची विद्यापीठाकडे तक्रार आल्यानंतर विद्यापीठाने चौकशी समिती नेमून या चौकशी समितीत कुऱ्हेकर दोषी आढळल्याने त्यांच्यावर विद्यापीठाने तत्काळ निलंबनाची कारवाई केली आहे. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदावर असणारे एस. पी. कुऱ्हेकर यांनी २३ मे रोजी याच महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. यानंतर त्या पीडित मुलीने विद्यापीठाकडे लेखी तक्रार केली. विद्यापीठाने तक्रारीची दखल घेऊन एक चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीच्या तपासात एस. पी. कुऱ्हेकर दोषी असल्याचे आढळले. तसा अहवाल चौकशी समितीने विद्यापीठाकडे १८ जुलैला सादर केला. यानंतर सोमवारी विद्यापीठाने कुऱ्हेकर यांना निलंबित केले; मात्र केवळ निलंबित करून त्यांना कठोर शासन व्हायला हवे असे म्हणत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करून एस. पी. कुऱ्हेकर यांना आमच्यासमोर हजर करा, अशा घोषणा देत पोलीस कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. एस. पी. कुऱ्हेकर यांनी आमचा विश्वासघात केला आहे. आम्ही विद्यार्थिनींनी प्राध्यापकांकडे जाणे चुकीचे आहे का? असा राग व्यक्त करीत विद्यार्थिनींनीही पोलीस कारवाई झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. कृषी विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. उत्तमकुमार महाडकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठ स्तरावर त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. विद्यापीठ स्तरावर कारवाई सुरूअसताना कायदा हाती घेऊ नका, असे आवाहन डॉ. महाडकर यांनी केले. आश्वासनानंतर आंदोलन मागे डॉ. संजय भावे यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. एक महिन्यात नक्की कारवाई होईल. एक महिन्यात जर आम्ही न्याय देऊ शकलो नाही तर याच गेटवर आंदोलन करून तुम्ही न्याय मागू शकता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन मागे घेतले.