शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: नाटळ ग्रामसभा हाणामारी प्रकरणी आणखी सात जणांना अटक, दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रार 

By सुधीर राणे | Updated: June 18, 2024 12:40 IST

२० जणांवर गुन्हा दाखल

कणकवली: नाटळ ग्रामसभेत ३ जून रोजी दुपारी भाजप व उद्धवसेना गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होत मारहाणीची घटना घडली होती. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी कणकवलीपोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंदविल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही गटाच्या वीस जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी दोघांना यापूर्वी अटक करण्यात आली. तर सोमवारी आणखीन सात जणांना अटक करण्यात आली. त्यांना आज, मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये गणेश मारुती सावंत (वय ३२), ऋषिकेश मारुती सावंत (३७ ), रमाकांत लक्ष्मण घाडीगावकर (५२ ), सचिन पांडुरंग सावंत, अभिषण शामराव सावंत, संजय शांताराम सावंत, रमेश रामचंद्र नाटळकर (सर्व राहणार नाटळ, ता.कणकवली) यांचा समावेश आहे.संशयित आरोपी विरोधात भादवि कलम ३०७,३२४,३२३, ३५२, ५०४,१४३,१४७,१४८,१४९ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे ३ जून २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी कणकवली पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, पोलिस हवालदार मिलिंद देसाई व गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत खोपडे, पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके आदी कर्मचाऱ्यांनी ही अटकेची कारवाई केली आहे.या हाणामारी प्रकरणी दिनानाथ पंढरीनाथ सावंत व नाटळ तंटामुक्ती अध्यक्ष गणेश मारुती सावंत यांनी कणकवली पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस