शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीतील सात अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 11:34 IST

अहमदनगर, श्रीरामपूर, पंढरपूर, सातारा येथून घेतले ताब्यात

कुडाळ (जि.सिंधुदुर्ग) : लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळीतील तीन पुरुष व नवरीसह चार महिलांना कुडाळ पोलिसांनी अहमदनगर, श्रीरामपूर, पंढरपूर, सातारा येथून ताब्यात घेत अटक केली आहे. संशयित टोळीने कुडाळ तालुक्यातील एकाचे लग्न लावून त्यानंतर नवरी पळून गेली. लग्नासाठी सुमारे १ लाख ४० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.कुडाळ पोलिस ठाण्यात ४२ वर्षीय तक्रारदार यांनी तक्रार दिली होती की, ते गेल्या चार वर्षांपासून लग्नाकरिता स्थळ पाहत होते. एक महिन्यापूर्वी अझिज नाईक (रा. माणगाव, ता. कुडाळ) व महेश पाटकर (रा. पाट दळवीवाडी, ता. कुडाळ) यांनी कुडाळ कोर्टाजवळील पाटेश्वर मंदिरात तक्रारदारास बोलावून अझिज नाईक याने चार पुरुष व महिलांना आणून मुलगी दाखवली. तिचे नाव रुपाली दत्ताजी पाटील असल्याचे सांगितले. तसेच, इतर आरोपींची ओळख त्या मुलीचे नातेवाईक म्हणून करून दिली. लग्नकार्यासाठी १ लाख ४० हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून घेतले.

त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी हुमरमळा वालावल येथे रुपाली पाटील हिच्याशी धार्मिक पद्धतीने लग्न लावून दिले. २६ फेब्रुवारी रोजी ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी तक्रारदार लग्न केलेल्या युवतीसह घरी आले. दुपारनंतर रुपाली पाटील ही घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. त्यानंतर तक्रारदार यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली.या प्रकरणातील नवरी मुलीसह संशयित विशाल मच्छिंद्र थोरात ( ३४, रा. उंदीरगाव रस्ता, गोडेगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर,) तसेच माधुरी प्रभाकर केदारी उर्फ भारती मदन ठोंबरे (३२, रा. संजयनगर, सूतगिरणी गेट, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) , संतोष दौलू काकडे ( ३७, रा. शिरोली, ता. करवीर जि. कोल्हापूर), संतोष गणाजी जगदाळे (४०, रा. दहीवडी, ता. माण, जि. सातारा), ज्योती संतोष शेलार ( ४३, रा. ता. वाई, जि. सातारा), मंगल संजय महापुरे (४८, रा. हेर्ले, हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांना अहमदनगर, श्रीरामपूर, पंढरपूर, सातारा येथून ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस