कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कोविड वॉर्ड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 03:07 PM2021-05-05T15:07:45+5:302021-05-05T15:09:35+5:30

CoronaVirus Kankavli Sindhudurg : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येऊ लागले आहे.रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित व इतर आजाराच्या गंभीर रुग्णांसाठी जंबो ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता भासू लागली आहे. ही समस्या तत्काळ दूर करावी, अशी मागणीही होत आहे.

Separate Kovid Ward in Kankavli Sub-District Hospital | कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कोविड वॉर्ड करा

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातून रिकामे झालेले ऑक्सिजन सिलिंडर भरण्यासाठी कर्मचारी घेऊन जातात.

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कोविड वॉर्ड करा नागरिकांची मागणी : जंबो ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येऊ लागले आहे. रुग्णालयातील एकाच इमारतीमध्ये सध्या कोरोनाबाधित व इतर रुग्णांवर उपचार होत आहेत. मात्र, संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित व इतर आजाराच्या गंभीर रुग्णांसाठी जंबो ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता भासू लागली आहे. ही समस्या तत्काळ दूर करावी, अशी मागणीही होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कणकवली हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने उपचारासाठी रुग्ण येत असतात. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर सध्या या रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये अशा रुग्णांना दाखल करून घेतले जात आहे. एकाच इमारतीमध्ये सध्या कोरोनाबाधित व इतर आजाराच्या रुग्णांसाठी उपचार होत असल्याने त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

कोरोना व इतर आजारांचे रुग्ण एकाच इमारतीमध्ये

कोरोनासह सर्वच आजारांचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक एकाच इमारतीमध्ये वावरत असल्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे बाधित रुग्णांची तपासणी करणे, त्यांना उपचारासाठी दाखल करणे, स्वॅब कलेक्शन सेंटर असे कोरोनाबाधित रुग्णांशी निगडित असलेले उपचारविषयक सर्व विभाग एकत्र करून जेणेकरून त्याचा संसर्ग इतर आजारांच्या रुग्णांवर होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे या रुग्णालयात अगोदरच आरोग्य कर्मचारी कमी आहेत. असलेल्या कर्मचाऱ्यांमधील कोणी कोरोनाबाधित झाले तर या रुग्णालयातील सेवेवर त्याचा परिणाम होणार आहे. याबाबतही विचार होणे आवश्यक आहे.

 

Web Title: Separate Kovid Ward in Kankavli Sub-District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.