शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनबाबतच्या तक्रारी पाठवा

By admin | Updated: November 9, 2014 23:35 IST

एम. डी. जोशी : कुडाळ येथील मेळाव्यात आवाहन

कुडाळ : पेन्शनरांच्या पश्चात घटस्फोटीत आणि विधवा मुली, अविवाहीत मुली, शारीरिकदृष्ट्या अपंग मुलींना मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनबाबत तक्रारी असल्यास संघटनेकडे पाठवाव्यात, असे आवाहन आॅल इंडिया सेंट्रल गव्हर्मेंट पेन्शनर्स असोशिएशन सिंधुदुर्गचे सचिव एम. डी. जोशी यांनी पेन्शनर्स असोसिएशनच्या मेळाव्यात बोलताना केले. येथील बॅ. नाथ पै विद्यालयात पंचक्रोशी सेंट्रल गर्व्हमेंट पेन्शनर्स फॅमिली पेन्शनदारांचा मेळावा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आर. एस. मेथर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. मेळाव्याच्या सुरुवातीला गुरुनाथ कुलकर्णी यांचे गीत झाले. सातव्या वेतन आयोगाची घोषणा आणि त्यांचे पेन्शनर फॅमिली पेन्शनरना मिळणारे अपेक्षित फायदे व ८0 व्या वर्षी व त्यानंतर मिळणारी वाढीव पेन्शन, त्यासाठी पेन्शनर, फॅमिली पेन्शनरनी करावयाची पूर्तता याबाबत माहिती जोशी यांनी दिली. महिला सबलीकरणाच्या दृष्टीकोनातून पेन्शनर, फॅमिली पेन्शनरच्या पश्चात घटस्फोटीत आणि विधवा मुली, अविवाहीत मुली व शारीरिकदृष्ट्या अपंग मुलामुलींना मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनबाबत जोशी यांनी माहिती देताना अशाप्रकारची अनेक प्रकरणे शासन दरबारी पडून असली, तर त्यांचा निपटारा करण्यासाठी संघटना प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मूळ पगार आणि महागाई भत्ता मिळून मूळ पेन्शन द्यावी, वैद्यकीय सुविधा सर्व पेन्शनर्सना वर्गवारी न करता समान द्यावी, मेडिकल भत्ता दोन हजार रुपये करावा, एडिशनल पेन्शन ६५ वर्षांपासून नव्वदव्या वर्षी १०० टक्के द्यावी, बीएसएनएल पेन्शनर्सना समान न्याय द्यावा, मूळ पेन्शन ५० टक्क्यांऐवजी ६७ टक्के द्यावी अशा अनेक मागण्या मेळाव्यात करण्यात आल्या. मालवणमधील संघटनेचे कार्यालय व पेन्शनर्ससाठी गेस्ट हाऊस उभारण्याच्या योजनेबाबत आर. एस. मेतर यांनी माहिती दिली. हा संपर्क पूर्ण करण्यासाठी सर्वांनी खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन त्यांनी केले. मेळाव्यात द. म. साटेलकर, व्ही. आर. दळवी, एस. एस. धुरी या ८० वर्षांवरील पेन्शनरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)