शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात १६ पैकी ४ प्रकल्पांवर फक्त चौकीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 20:14 IST

Irrigation Projects Konkan : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटीच्या घटनेला दोन वर्षे उलटली. मात्र, यातून प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लघु पाटबंधारे प्रकल्पांची सुरक्षा बेभरवशाचीच असल्याचे दिसत असून, १६ पाटबंधारे प्रकल्पांपैकी ४ प्रकल्पांवरच चौकीदार नेमण्यात आले आहेत. तर उर्वरित धरणांवर पाणी सोडण्यापुरते नामधारी असल्याचे दिसत असून शासनस्तरावर याची दखल घेऊन पावसाच्या तोंडावर चौकीदार नेमणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देलघुपाटबंधारे प्रकल्पांची सुरक्षा रामभरोसेतिवरेच्या दुर्घटनेनंतर धडाच घेतला नाही

अनंत जाधवसावंतवाडी : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटीच्या घटनेला दोन वर्षे उलटली. मात्र, यातून प्रशासनाने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. रत्नागिरीप्रमाणेसिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लघु पाटबंधारे प्रकल्पांची सुरक्षा बेभरवशाचीच असल्याचे दिसत असून, १६ पाटबंधारे प्रकल्पांपैकी ४ प्रकल्पांवरच चौकीदार नेमण्यात आले आहेत. तर उर्वरित धरणांवर पाणी सोडण्यापुरते नामधारी असल्याचे दिसत असून शासनस्तरावर याची दखल घेऊन पावसाच्या तोंडावर चौकीदार नेमणे गरजेचे आहे. अन्यथा शासन रामभरासे कारभारामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते एवढे नक्की म्हणावे लागेल.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीची घटना ताजी असतानाच जलसंपदाच्या लघुपाटबंधारे विभागाने धरण प्रकल्पावर असलेले चौकीदार सेवानिवृत्त झाल्यानंतर ती पदेच भरली नसल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत.

तिवरे प्रकल्प मध्यरात्री फुटला. त्यानंतर त्यातील अनेक दोष समोर आले. त्यात विशेषत: धरणाच्या देखभालीचा विषय आल्याचे दिसून आले. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पाटबंधारे विभागाने चोवीस तास धरणावर करडी नजर ठेवण्यासाठी दोन व्यक्तींची निवड केली होती. ती कंत्राटी पद्धतीची आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याच्या उलट पावसाळी कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची नामधारी व्यवस्था करण्यात आली असून, अतिवृष्टीमुळे धरण ओव्हरफ्लो होते.कायमस्वरूपी चौकीदार हवायातील काही प्रकल्प हे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्या धरणांना पाणीगळती लागलेली आहे. त्यामुळे अशा प्रकल्पांवर कायमस्वरूपी चौकीदार नेमला जावा, अन्यथा रामभरोसे कारभारामुळे पुन्हा एकदा तिवरेसारखी घटना घडू नये एवढेच यातून दिसते आहे. तसेच अतिवृष्टीमुळे धरण ओव्हरफ्लो झाल्यास यावेळी माणसाची गरज भासणार आहे. त्यामुळे तशी मागणी आता जोर धरत आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरी