शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपाचा तिढा कायम

By admin | Updated: September 16, 2014 23:24 IST

कणकवली मतदारसंघ : राणेंच्या घोषणेनंतरही राष्ट्रवादी आशावादी

प्रकाश काळे- वैभववाडी -काँग्रेस नेते पालकमंत्री नारायण राणे यांनी स्वत: कुडाळमधून तर स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांची कणकवलीतून उमेदवारी घोषित केली आहे. मात्र, कणकवली मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मतदारसंघात काही पदांवर राष्ट्रवादीने खांदेपालट केला आहे. त्यामुळे आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसल्याने राणेंच्या घोषणेनंतरही कणकवली मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आशावादी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र फाटकांसाठी कणकवली राणेंना तर दीपक केसरकरांसाठी सावंतवाडी मतदारसंघ राष्ट्रवादीला हवा होता. त्यामुळे एकमेकांची गरज लक्षात घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समन्वयातून जागांची अदलाबदल केली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचा फायदा झाला तर काँग्रेसचे नुकसान झाले होते. मात्र, ज्यांच्यासाठी आघाडीने त्यावेळी जागांची अदलाबदल केली ते रवींद्र फाटक आणि माजी आमदार दीपक केसरकर शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे २००९ पूर्वीप्रमाणे देवगडचा समावेश असलेला कणकवली मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. तर गेल्याच आठवड्यात सावंतवाडी मतदारसंघाच्या मागणीचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी पुनरुच्चार केला आहे.कणकवली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या तिन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे या मतदारसंघाची मागणी केली आहे. तर गेल्यावेळच्या अदलाबदलानुसार सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सावंतवाडी मतदारसंघातून उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे जुने कोणीच पुढे यायला तयार नाहीत. त्याउलट काँग्रेसकडे माजी राज्यमंत्री प्रविण भोसले व काँग्रेसवासी होण्याआधीपासूनच दोडामार्ग, वेंगुर्ले, सावंतवाडीत संपर्क असणारे कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर असे दोन सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्या सावंतवाडी मतदारसंघ मागणीचा पुनरुच्चार आणि राष्ट्रवादीच्या कणकवलीच्या मागणीच्या आग्रहावर आघाडीच्या जागावाटपात चर्चा होण्याची शक्यता आहे.काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे व विधानपरिषद आमदार विजय सावंत यांच्या काँग्रेसकडून मुलाखती झाल्या असल्या तरी नीतेश राणेंची उमेदवारी आजच्या घडीला निश्चित मानली जात आहे. मात्र, आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसल्यामुळे राणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. त्यामुळेच पालकमंत्री नारायण राणे यांनी कणकवलीतून नीतेश राणेंच्या उमेदवारीची घोषणा केली असली तरी गेल्याच आठवड्यातील काही पदांचा राष्ट्रवादीने मतदारसंघात केलेला खांदेपालट, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कणकवलीबाबतचा आग्रह आणि मत्स्य उद्योग महामंडळाचे माजी उपाध्यक्ष कुलदीप पेडणेकर, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल रावराणे व डॉ. अभिनंदन मालंडकर यांच्या झालेल्या उमेदवारीसाठी मुलाखतींचा विचार करता आघाडीतील तिढा सुटला नसल्याने कणकवलीबाबत राष्ट्रवादी आशावादी असल्याचे दिसून येते. राजन तेलींशी कोणतीही कमिटमेंट नाहीराणे समर्थक माजी आमदार राजन तेली यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी तो विनाअट प्रवेश आहे. त्यांच्याशी पक्षाच्या नेतृत्वाने कोणतीही कमिटमेंट केलेली नाही. त्यामुळे सावंतवाडीतील उमेदवारीबाबत त्यांच्या प्रवेशाशी संबंध जोडणे उचित ठरणार नाही, असे राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले आहे.