सावंतवाडीतून शाळकरी मुलाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 10:12 IST2019-09-28T10:12:23+5:302019-09-28T10:12:28+5:30

शहरातील माठेवाडा  परिसरातून निखील मनोज गुप्ता या शाळकरी  मुलाचे शुक्रवारी दुपारी अपहरण झाले

School kidnapping from Sawantwadi | सावंतवाडीतून शाळकरी मुलाचे अपहरण

सावंतवाडीतून शाळकरी मुलाचे अपहरण

सावंतवाडी : शहरातील माठेवाडा परिसरातून निखील मनोज गुप्ता या शाळकरी  मुलाचे शुक्रवारी दुपारी अपहरण झाले आहे. त्याच्या वडिलांनी  सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.  निखिल याच्याकडे मोबाईल असून  त्याचे शेवटचे लोकेशन रत्नागिरी दाखवत होते सावंतवाडी पोलिसांनी ठिकठिकाणी  नाकाबंदी करून गाड्यांचा शोध घेतला.  तसेच  रेल्वेस्थानकावर ही तपासणी केली  संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात  मुलाला शोधण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे  जिल्हा बाहेरच्या पोलिसांनाही  संपर्क करण्यात आला असून  मुलगा मुंबईच्या दिशेने गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध मोहीम सुरू केली आहे

Web Title: School kidnapping from Sawantwadi