शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

शाळकरी मुलांनी केली चैनीसाठी घरफोडी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 3:22 PM

कणकवली शहरात शाळकरी मुलांनी चैनीसाठी घरफोडी केल्याचे उघड झाले आहे. कणकवली पोलिसांनी घरफोडी गुन्ह्यात शहरातील तीन शाळकरी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही घरफोडीची घटना ५ मार्च रोजी घडली होती.

ठळक मुद्दे मुलांनी चैनीसाठी घरफोडी केल्याचे उघड !कणकवली शहरातील अल्पवयीन बाल न्यायालयात

कणकवली : कणकवली शहरात शाळकरी मुलांनी चैनीसाठी घरफोडी केल्याचे उघड झाले आहे. कणकवली पोलिसांनी घरफोडी गुन्ह्यात शहरातील तीन शाळकरी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही घरफोडीची घटना ५ मार्च रोजी घडली होती.याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली तहसील कार्यालयाजवळील चाळीत दिलीप मालवणकर हे रहातात. त्यांचे घर फोडून ५ मार्च रोजी रोख ३९ हजार रुपये अज्ञात चोरट्यानी लंपास केले होते. मालवणकर आपल्या कुटुंबीयांसह महाशिवरात्रीला भुदरगड येथे गावी गेले असताना घराचा मागील दरवाजा फोडून चोरट्यानी ही चोरी केली होती.मालवणकर यांच्या घरातील लोखंडी कपाट, पर्स आणि पाउचमधील रोख ३९ हजारांच्या रक्कमेवर डल्ला मारण्यात आला होता. गावावरून कणकवली येथे परतल्यावर मालवणकर यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. तसेच पोलीस तपासा दरम्यान घराशेजारीलच मुलांनी चोरी केल्याचा संशय मालवणकर यांनी व्यक्त केला होता.त्यानुसार पोलीस तपास करीत होते. अधिक तपास करताना नववी आणि दहावीत शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांवर तपास केंद्रित करण्यात आला. त्या तिन्ही संशयितांना २५ मार्च रोजी दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक चौकशी केल्यावर त्या तिघा मुलांनी आपण चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्यांच्या पालकांना त्याबाबत कल्पना देण्यात आली. तसेच अधिक चौकशीनंतर रात्री पालकांकडे त्यांना सुपूर्द करण्यात आले.कणकवली पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे यांनी वाहतूक पोलीस नाईक प्रकाश गवस ,चालक उबाळे यांच्या सहाय्याने हा यशस्वी तपास करण्यात आला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, हवालदार बाळू कांबळे यांनीही या तपासात सहकार्य केले. त्या अल्पवयीन मुलांकडून चोरीतील पैशांपैकी ३६ हजार ३५ रुपये परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.दरम्यान, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर तिन्ही अल्पवयीन आरोपीना बालन्यायालयात हजार करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याआधीसुद्धा त्या तिन्ही शाळकरी मुलांनी मालवणकर यांच्या घरात हातसफाई करत रोख रक्कम चोरल्याचे उघड होत आहे. मात्र याबाबत मालवणकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. या घटनेमुळे कणकवली शहरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस