शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

नारायण राणेंना 'स्वाभिमानी धक्का', सिंधुदुर्गातील निकटवर्तीयाने साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 20:58 IST

आमदार नितेश राणे यांनी गेल्या पाच वर्षात कणकवली विधानसभा मतदारसंघात आपल्याला विश्वासात घेतलेले नाही.

कणकवली  : नारायण राणे यांचे खंदे समर्थक आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपल्या कलमठ येथील निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. सावंत यांच्या स्वाभिमानी धक्क्यामुळे राणेंना मोठा धक्का असल्याचं मानलं जातयं. नारायण राणे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. 

आमदार नितेश राणे यांनी गेल्या पाच वर्षात कणकवली विधानसभा मतदारसंघात आपल्याला विश्वासात घेतलेले नाही. पक्षाचे नेते नारायण राणे यांनी सुद्धा गेल्या आठ दिवसात माझ्यावर अविश्वास दाखवला तसेच आपण भाजपमधून निवडणूक लढणार असून मला कुडाळ मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढण्याचा सल्ला दिल्याने मी नाराज झालो. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सदस्य पदाचा आणि प्रवक्तेपदाचा आज राजीनामा देत आहे असे सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी गेली 24 वर्षे राजकारणात आहे. त्यांच्यासोबत प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला. ज्या पदाची जबाबदारी दिली ती चांगल्या पद्धतीने यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. पण मी कोणत्याही पक्षात जाणार नव्हतो. आमदारकीबाबत माझा कोणताही विचार नव्हता, तरीही माझ्याबाबत वेगवेगळ्या चर्चा घडविण्यात आल्या. मी मातोश्रीवर गेलो असे सांगण्यात आले. मी कणकवलीत असतानाही माझ्याबाबत वेगवेगळ्या वावड्या उठविण्यात आल्या. माणसे पाठवून खात्री करण्यात आली. यामुळे जर पक्षनेतृत्वाचा विश्वास आपल्यावर नसेल तर त्या पक्षाचे काम करणे अवघड आहे. त्यामुळे यापुढे शेती, सहकार आणि सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे स्वप्न घेऊन काम करण्याची आपली इच्छा आहे. माझे विचार ज्या पक्षाला पटतील त्या पक्षासोबत मी जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, असेही सावंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नेमकं कोणत्या पक्षात सावंत जाणार हे कोडं अद्याप उलघडलं नाही, आता सावंत कोणता झेंडा हाती घेणार याचीच कणकवलीत चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे KankavliकणकवलीSatish Sawantसतीश सावंतBJPभाजपा