शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना सतीश सावंत यांनी दिला सन्मान : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 19:42 IST

Banking Sector Deepk kesrkar SIndhudurg : राजकारणापलीकडे जाऊन कसे काम करावे हे सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर राहून दाखवून दिले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार क्षेत्रात चांगले काम करतानाच शेतकऱ्यांना सन्मान देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी गुरुवारी बँकेच्या ३८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

ठळक मुद्देजिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना सतीश सावंत यांनी दिला सन्मान : दीपक केसरकर बँकेचा ३८व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रतिपादन

ओरोस : राजकारणापलीकडे जाऊन कसे काम करावे हे सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर राहून दाखवून दिले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार क्षेत्रात चांगले काम करतानाच शेतकऱ्यांना सन्मान देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी गुरुवारी बँकेच्या ३८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ३८व्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्यावतीने कोरोनामध्ये दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना आर्थिक मदत, जास्त भातविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान कार्यक्रम जिल्हा बँकेच्या सभागृहात जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आम. वैभव नाईक, उपाध्यक्ष सुरेश दळवी, संचालक मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते. सुरुवातीला बँकेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गेल्या खरीप हंगामात जास्तीत जास्त भातविक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शाल, श्रीफळ, जांभूळ झाड देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सतीश सावंत म्हणाले की, बँकेचे चांगले काम आणि चांगल्या योजना यामुळेच बँकेचा एनपीए शून्य टक्के राहण्यास मदत झाली आहे. बँकेच्या सभासदांना १०.६० टक्के लाभांश देणारी राज्यातील एकमेव बँक आहे. बँकेने यांत्रिकीकरणासाठी मदत केल्यानेच जिल्ह्यात भात शेतीक्षेत्र व उत्पादन वाढले आहे. ही बँक शेतकऱ्यांची असल्याने शेतकऱ्यांसाठी आणखी काही करता येईल का, यासाठी आपले प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार वैभव नाईक म्हणाले की, शेतकऱ्यांना फायदा होईल हे बँकेचे उद्दिष्ट आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळेच या बँकेने अनेक पुरस्कार मिळविले आहेत. छोट्या योजनांसाठी कर्ज पुरवठा बँकेने केल्याने यांत्रिकीकरण वाढून शेतकरी समृध्द झाला आहे. शेतकऱ्यांना सन्मान देण्याचे काम बँक करीत असून यापुढेही हे कार्य सुरू राहील.देर आये दुरुस्त आयेचांदा ते बांदा योजना चांगली होती. मात्र या योजनेची राष्ट्रीयीकृत बँकांनी योग्य प्रकारे अंमलबजावणी केली नाही. त्यावेळी जिल्हा बँक ही योजना आपल्याकडे मागत होती. मात्र त्यावेळी सतीश सावंत हे दुसऱ्या पक्षात होते. परंतु आता ते आमच्या पक्षात आहेत. चांदा ते बांदाऐवजी सिंधुरत्न योजना सुरू झाली आहे. देर आये दुरुस्त आये असे सांगत सिंधुरत्न योजनेत जिल्हा बँकेच्या माध्यमातून चांगले काम करण्याची आमदार दीपक केसरकर यांनी ग्वाही दिली. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रDeepak Kesarkarदीपक केसरकर Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्गSatish Sawantसतीश सावंत