शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली विधानसभा मतदार संघातील सरपंचांना विमा कवच, नीतेश राणे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 16:42 IST

Kankavli NiteshRane -मतदारसंघातील सर्व सरपंचांचा विमा उतरवून त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे. येत्या चार दिवसांत सर्व सरपंचांचा विमा उतरविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती भाजपा आमदार नीतेश राणे यांनी  दिली.

ठळक मुद्दे कणकवली विधानसभा मतदार संघातील सरपंचांना विमा कवच, नीतेश राणे यांची माहिती ३ लाखांच्या आरोग्य विम्यासह ७ लाख ५० हजारांपर्यंत मिळणार मोबदला

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्व सरपंचांना प्रत्येकी ३ लाखांचा आरोग्य विमा आणि ७ लाख ५० हजारापर्यंतचा मोबदला मिळेल असे विमा कवच दिले जाणार आहे. ज्या मतदारांनी मला निवडून दिले आहे त्या सर्वांचे मी प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यामुळे मतदारसंघातील सर्व सरपंचांचा विमा उतरवून त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे. येत्या चार दिवसांत सर्व सरपंचांचा विमा उतरविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती भाजपा आमदार नीतेश राणे यांनी  दिली.नीतेश राणे यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, एक वर्षासाठी असणाऱ्या या विम्याला तीन लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या सरपंचांचा ३ लाखांचा खर्च झाला असेल तर त्यांना आणखी ७५ हजार रुपये वाढवून मिळणार आहेत. तसेच रुग्णवाहिकेपासून व्हीआयपी उपचार पद्धती यात लागू होणार आहे. कोरोनाबरोबरच इतर आजारही या विमा कवचमध्ये समाविष्ट केले आहेत. एकूण सात ते साडेसात लाख रुपयांचा खर्च देशातील नावाजलेली चोला मंडलम ही प्रसिद्ध विमा कंपनी या उपक्रमाच्या माध्यमातून करणार आहे.या विमा कंपनीशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णालये आहेत. अजून काही रुग्णालये जोडली जाणार आहेत. कोरोनामुक्त गावाबरोबरच तो भयमुक्त करणे गरजेचे आहे. सर्वच सरपंच या फ्रंटलाईनवर काम करतात त्यांना संरक्षण देणे गरजेचे होते. त्यामुळे माझ्या मतदार संघातील सरपंचांपासून सुरुवात केली आहे. संपूर्ण जिल्हा हा राणे कुटुंबीयांवर प्रेम करणारा आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाली की संपूर्ण जिल्ह्यासाठीही निश्चितच विचार करू.सत्ताधाऱ्यांनी अनुकरण करावे !माझ्या या कामाचे सत्ताधारी आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांनी अनुकरण करावे. तसेच त्यांनी जिल्ह्यातील इतर तालुक्यातील सरपंचांना विमा कवच द्यावे. त्यात ते कमी पडले तर भाजपाच्यावतीने आम्ही सर्व सरपंचांना विमा कवच देऊ. असा टोलाही नीतेश राणे यांनी यावेळी लगावला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsarpanchसरपंचNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग