सरपंचांनीच केली उपसरपंचाच्याच घरात घुसून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 13:37 IST2017-08-05T13:33:29+5:302017-08-05T13:37:27+5:30

सरपंचांनीच केली उपसरपंचाच्याच घरात घुसून मारहाण
सिंधुदुर्ग, दि.5 - कणकवली तालुक्यातील डामरे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच शैलेश कानडे यांना त्यांच्याच राहत्या घरात घुसून १०-१५ लोकांनी काठ्या कोयत्याने मारहाण केली. या मारहाणीत कानडे यांच्या पत्नी श्रद्धा कानडे या देखील जखमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे ही मारहाण चक्क याच ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांनीच केली असल्याचा आरोप उपसरपंच कानडे यांनी केला आहे. या मारहाणीत कानडे यांना व पत्नीला जबर दुखापत झाली असून अधिक उपचार उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहेत. याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एस.बी. पाटील आणि श्रीमती ए.ए. पवार करीत आहेत.