शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संतोष परब हल्ला प्रकरण : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंतांना दोन दिवसाची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 16:27 IST

कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना न्यायालयाने दोन दिवसाची ...

कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. कणकवली दिवाणी न्यायाधीश सलीम जमादार यांनी सावंत यांना १६ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी कणकवली न्यायालयासमोर शरण आले. त्यानंतर त्यांना दुपारी कणकवली न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 

यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तसेच अजून पोलीस तपास करायचा आहे. यासह अन्य मुद्दे उपस्थित करत सावंत यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. 

तर गोट्या सावंत यांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे व ॲड. उमेश सावंत यांनी युक्तिवाद केला. यावेळी या गुन्ह्यातील बहुतांशी तपास पूर्ण झाला आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलीस तपासात गोट्या सावंत यांचा सहभाग निष्पन्न झालेला नाही.जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने हा आरोप करण्यात आला होता. असा युक्तिवाद ॲड. रावराणे यांनी केला. यावेळी संतोष परब हल्ल्या प्रकरणाचे तपास अधिकारी तथा कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर देखील उपस्थित होते. 

दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर कणकवली दिवाणी न्यायाधीश सलीम जमादार यांनी संदेश सावंत यांना १६ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी