शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत हेच देशाचे मोठे गद्दार, नितेश राणे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 12:27 IST

भारताच्या बाहेर जाऊन बदनामी करणारे देशाभिमानी असे राऊत आणि ठाकरे यांना वाटत असेल तर ते दुर्दैवी

कणकवली : राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात 'खलिस्तान जिंदाबाद' च्या घोषणा दिल्या जातात. पाकिस्तानचे झेंडे फडकवत समर्थन केले जाते. मात्र, ते काही बोलत नाहीत. अशा लोकांचे समर्थन करणारे एकत्र येत असतील आणि त्यांना संजय राऊत हे राष्ट्रभक्त म्हणत असतील तर त्यांच्या इतके गद्दार देशात दुसरे कोणी नसेल, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. कणकवली येथे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी ते म्हणाले, सचिन तेंडुलकर, विराट कोहली हे देशाचा अभिमान आहेत. त्यांनी भारत देशाला सन्मान मिळवून दिला आहे. त्यांची तुलना संजय राऊत हे राहुल गांधी यांच्याशी करत आहेत. तर राहुल गांधी यांनी देशासाठी काय केले आहे? हे राऊत यांनी सांगावे. राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारत देशाची आणि हिंदू धर्माची बदनामी करत आहेत, हे संजय राऊत यांना भांडुपमध्ये बसून कळत नाही काय ?पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात गेले तेव्हा, 'हिंदुस्तान जिंदाबाद', 'भारत माता की जय 'अशा घोषणा दिल्या जात होत्या. तर राहुल गांधी यांच्या सभेत 'खलिस्तान जिंदाबाद'चे नारे देण्यात आले. हा या दोन देशप्रेमींमधला फरक आहे. राहुल गांधी यांचे भाषण चालू असताना समोर बसलेले लोक भारताचे राष्ट्रगान सुरू असताना उभेसुद्धा राहिले नाहीत.

राहुल गांधी अपमान करतात तो मान्य आहे काय?मोदींच्या संस्कार आणि सभ्यतेचा, नमस्काराचा, देशाचा राजदंड (सेंगोल) नवीन संसद भवनाची खिल्ली अमेरिकेत राहुल गांधी उडवत आहेत. भारताच्या बाहेर जाऊन बदनामी करणारे देशाभिमानी असे राऊत आणि ठाकरे यांना वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे. राहुल गांधी जो हिंदू धर्माचा अपमान करतात तो राऊत आणि ठाकरे यांना मान्य आहे काय? असा सवाल यावेळी नितेश राणे यांनी केला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधी