शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: संदेश पारकर, अतुल रावराणे यांची भाजपामधून हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 15:25 IST

Konkan Election 2019 : संदेश पारकर, अतुल रावराणे, कणकवली तालुकाध्यक्ष संदेश पटेल आणि वैभववाडीचे सभापती लक्ष्मण रावराणे यांची भाजप पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली

कणकवली : कणकवली मतदारसंघात भाजपाचे अधिकृत उमेदवार असताना विरोधी उमेदवाराचा प्रचार करून पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी भाजपाचेसंदेश पारकर, अतुल रावराणे, कणकवली तालुकाध्यक्ष संदेश पटेल आणि वैभववाडीचे सभापती लक्ष्मण रावराणे यांची भाजप पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे दिली.जठार म्हणाले, काल मुख्यमंत्र्यांचा कणकवली दौरा झाला. यावेळी संपर्क मंत्री रवींद्र चव्हाण, कोकण संघटनमंत्री सतिष धोंड यांनी कणकवलीत येऊन या चौघांची हकालपट्टी करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार या चौघांवर पुढील सहा वर्षासाठी भाजपमधून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान हकालपट्टी करण्यापूर्वी या चौघांनाही जिल्ह्याचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चर्चा करण्यासाठी कणकवलीत बोलावले होते. यात संदेश पारकर उपस्थित राहिले मात्र इतर मंडळी आली नाहीत.दरम्यान संदेश पारकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाण यांनी केला. मात्र त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. भाजपमध्ये आता संदेश पारकर आणि अतुल रावराणे हे कुठलेही नेते राहिले नाहीत. या दोघांकडे यापूर्वीदेखील कुठलीही पदे नव्हती. हे दोघेही बिन पदाचे फुल अधिकारी होते. मात्र ते आता भाजपामध्ये नाहीत, असेही जठार म्हणाले.

टॅग्स :Sandesh Parkarसंदेश पारकरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kankavli-acकणकवलीBJPभाजपा