शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली विधानसभा मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार संदेश पारकर यांची संपत्ती ९ कोटी ५५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 17:48 IST

कणकवली : महाविकास आघाडीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदेश भास्कर पारकर यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची ...

कणकवली: महाविकास आघाडीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदेश भास्कर पारकर यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची तसेच पत्नी व मुलांची मिळून एकूण संपत्ती ९ कोटी ५५ लाख, ७४ हजार ९२१ रुपये एवढी आहे. तर  पारकर व पत्नीच्या नावे बँका व पतसंस्थांचे मिळून १ कोटी ५७ लाख ९१ हजार ७०९ रुपये एवढे कर्ज आहे.२०२३-२४ या आर्थिक वर्षात संदेश पारकर यांचे ९ लाख ७० हजार ४२० रुपये आणि पत्नी समृद्धी यांचे ११ लाख ३८० रुपये एवढे करपात्र उत्पन्न आहे. संदेश पारकर यांच्याकडे दीड लाख, पत्नीकडे २ लाख तर मुलगा सौरभ याच्याकडे ५० हजार व मुलगी गांधर्वी हीच्याकडे २५ हजार रुपये रोख रक्कम आहे.संदेश पारकर यांच्याकडे ५० ग्रॅम, पत्नीकडे २०० ग्रॅम सोने तसेच पारकर व पत्नी व मुलांकडे मिळून तीन दुचाकी, एक फॉर्च्यूनर, एक इनोव्हा, एक डंपर, दोन आयवा, एक जेसीबी, एक डीमॅक्स टेम्पो तसेच एलआसी, शेअर्स आरडी अशी मिळून २ कोटी ३९ लाख ६८ हजार ३२१ रुपयांची जंगम मालमत्ता आहे.तर स्वसंपादित व वारसाहक्क मिळून कणकवलीसह शिवडाव, करंजे येथे जमीन, गोवा, कोल्हापूर येथे घर अशाप्रकारे मिळून ७ कोटी १६ लाख ६ हजार एवढी स्थावर मालमत्ता आहे. पारकर यांच्या नावे ८८ लाख २५ हजार ९१४ रुपयांचे तर पत्नीच्या नावे ६९ लाख ६५ हजार ७९५ रुपयांचे कर्ज आहे. तर पारकर यांच्यावर ५ फौजदारी गुन्हे प्रलंबित आहेत,असे उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kankavli-acकणकवलीUddhav Thackerayउद्धव ठाकरेthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024