जिल्ह्यात ९ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट, समाधान चव्हाण यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:29 IST2020-06-09T14:28:22+5:302020-06-09T14:29:17+5:30
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवून वनविभाग यावर्षी काम करणार आहे. कोरोनाचे संकट असले तरी ...

सावंतवाडी वन विभागामार्फत पर्यावरण दिनानिमित्त उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गजानन पाणपट्टे, प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवून वनविभाग यावर्षी काम करणार आहे. कोरोनाचे संकट असले तरी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने त्यांनी वनविभागामार्फत राबविण्यात येणारे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कशाप्रकारे पूर्ण करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती दिली.
ते म्हणाले, सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे वृक्ष लागवड मोहिमेत अनेक अडचणी आल्या आहेत. तरीही आम्ही आगामी वर्षात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बांधील आहोत. यात एकूण ९ लाखांचे उद्दिष्ट आहे. यात वनविभाग एक लाख, ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य सात लाख ५१ हजार आणि सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून २५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यात कोणताही खंड पडू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येकाने झाडे लावलीच पाहिजेत
झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश सर्व जनतेला दिला जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावलीच पाहिजेत, असे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी सांगितले. आंबोली येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले आहे. वनविभागाने झाडे लावण्याचा चंग बांधला असून त्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे, असेही चव्हाण म्हणाले.
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक आय. ए. जलगावकर, सावंतवाडी वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे, प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.