सहदेव नार्वेकर बनला शरीरसौष्ठवचा विजेता
By Admin | Updated: July 16, 2014 00:26 IST2014-07-16T00:16:24+5:302014-07-16T00:26:29+5:30
पारकर मित्रमंडळाच्यावतीने आयोजन : शिरोड्यातील सोन्सुरकर व्यायामशाळेचा विद्यार्थी

सहदेव नार्वेकर बनला शरीरसौष्ठवचा विजेता
वेंगुर्ले : वेंगुर्लेतील संदेश पारकर मित्रमंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सोन्सुरकर व्यायामशाळा शिरोडामधील व्यायामपटू सहदेव अशोक नार्वेकर याने प्रथम येण्याचा मान मिळविला.
येथील साईमंगल कार्यालयात पारकर मित्रमंडळ वेंगुर्लेने आयोजित केलेल्या या शरीरसौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक शैलेश गावडे यांच्या हस्ते झाले. तर बक्षीस वितरण सोहळा नगरसेवक शैलेश गावडे, उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, सभापती अभिषेक चमणकर, शैलेश पाटील, किशोर सोन्सुरकर, जयवंत चुडनाईक, नंदन वेंगुर्लेकर, सुरेंद्र चव्हाण, विद्याधर पालकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
या शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक सोन्सुरकर व्यायामशाळा शिरोडाचा व्यायामपटू सहदेव नार्वेकर याने पटकावला तर बेस्ट पोझर म्हणून श्री सातेरी व्यायामशाळा वेंगुर्लेच्या जयेश परब याची निवड करण्यात आली.
मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर म्हणून सोन्सुरकर व्यायामशाळा शिरोडाच्या व्यायामपटू प्राजेश जयवंत गावडे यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेत द्वितीय दशरथ कुर्ले, तृतीय जयेश परब, चतुर्थ प्राजेश गावडे, पाचवा क्रमांक किरण जाधव, सहावा क्रमांक गंगाराम नाईक, सातवा क्रमांक समीर सातोस्कर, आठवा क्रमांक मनोहर कावले, नववा प्रतीक मोरजे असे क्रमांक पटकावले.
या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून राष्ट्रीय पंच किशोर सोन्सुरकर, सहाय्यक म्हणून हेमंत नाईक, अमोल तांडेल, संतोष कीर, स्टेज मार्शल म्हणून विजय धुरत व हेमंत चव्हाण यांनी काम पाहिले. स्पर्धेला स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद
लाभला. (प्रतिनिधी)