विधानसभेवर भगवा फडकविणार

By Admin | Updated: June 29, 2014 00:50 IST2014-06-29T00:48:41+5:302014-06-29T00:50:03+5:30

शिवसेना जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत निर्धार

The saffron will be dressed in the assembly | विधानसभेवर भगवा फडकविणार

विधानसभेवर भगवा फडकविणार

कुडाळ : महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकविण्याचे शिवसेना प्रमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सुरू केलेली महाराष्ट्रव्यापी मोहीम जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करून यशस्वी करणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख वैभव नाईक व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची सभा कुडाळच्या शासकीय विश्रामगृहावर पार पडली. या सभेला वैभव नाईक, अरुण दुधवडकर, गौरीशंकर खोत, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, कुडाळ महिला प्रमुख वर्षा कुडाळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. दुधवडकर म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र शिवसेनेचा भगवा झंजावात महाराष्ट्रव्यापी मोहीम आणि शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी शिबिर राज्याच्या २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये २४ ते २३ जुलै या कालावधीत केला आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार ‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ हे अभियान येथील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने संपूर्ण जिल्ह्यात चांगल्या पध्दतीने राबविणार. या अभियानात गाव तेथे शाखा, मतदार हक्क अभियान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराचे वस्त्रहरण, आता येणार महायुतीचे सरकार असे अनेक कार्यक्रम राबविणार असून पक्ष संघटना मजबुतीवर अधिक भर देणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले. तसेच लोकसभेतील शिवसेनेचे यश पाहून अनेक इतर पक्षीय शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. परंतु कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार योग्य चाचपणी केल्यानंतरच पक्षप्रवेश दिला जाणार आहे, असेही नाईक यांनी स्पष्ट केले. शासनाच्या जाचक अटी, तरतुदी व येथील सेतू विभागाविरोधात आलेल्या तक्रारींविरोधात लवकरच आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवसेनेच्या जिल्हा समितीपदी अ‍ॅड. विनायक वेंगुर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत चांगले काम केलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच चंद्रकांत कासार हे पुन्हा शिवसेनेत सक्रीय झाल्याची माहिती वैभव नाईक यांनी दिली. यावेळी सेनेच्या सभासद नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: The saffron will be dressed in the assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.