वाढदिवसाचे सेलिब्रेशन संपवून सचिन तेंडुलकर थेट मैदानावर, गोव्याहून अहमदाबादच्या दिशेने रवाना

By अनंत खं.जाधव | Updated: April 25, 2023 18:10 IST2023-04-25T18:09:57+5:302023-04-25T18:10:46+5:30

मुंबईचा आज गुजरातशी सामना 

Sachin Tendulkar left for Ahmedabad from Goa directly to the ground after the birthday celebrations | वाढदिवसाचे सेलिब्रेशन संपवून सचिन तेंडुलकर थेट मैदानावर, गोव्याहून अहमदाबादच्या दिशेने रवाना

वाढदिवसाचे सेलिब्रेशन संपवून सचिन तेंडुलकर थेट मैदानावर, गोव्याहून अहमदाबादच्या दिशेने रवाना

सावंतवाडी : 50 व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे येथे आलेल्या माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी दोन दिवसाच्या मुक्कामानंतर मंगळवारी सकाळी गोव्याच्या दिशेने रवाना झाला असून. तो गोव्याहून विमानाने अहमदाबादला रवाना होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयानी सांगितले.
सचिनचा मुलगा अर्जुन हा मुंबई इंडियन्स कडून खेळत असून त्याचा आज अहमदाबाद येथील मैदानावर गुजरात विरूद्ध सामना आहे. त्यासाठी सचिन कुटुंबासमवेत अहमदाबादकडे रवाना झाला.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपला 50 वा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे येथील एका पंचतारांकित हॉटेल्स मध्ये साजरा केला. तो रविवार पासूनच भोगवे येथे आला होता. तेथील बीचचा आनंद लुटत क्रिकेट ही खेळला तसेच परूळे येथे मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला. दोन दिवस सचिनने त्याच्या कुटुंबासह मित्रांसमवेत धमाल मस्ती केली. पर्यटनाचा आनंद लुटला.

त्यानंतर आज सकाळीच वाढदिवसाचे सेलिब्रेशन आटपून सचिन गोवा येथील मोपा विमानतळाकडे रवाना झाला तत्पूर्वी त्याने भोगवे येथील स्थानिकांना बाय बाय केले तसेच हाॅटेल व्यवस्थापन याच्या शुभेच्छा स्वीकारत फोटोसेशन ही केले. सचिनच्या आगमनाने त्याचे चाहते चांगलेच खुश झाले होते. मात्र सकाळीच तो भोगवे वरून परूळे पिगुळी वरून थेट झाराप पत्रादेवी महामार्गावरून मोपा विमानतळावर पोचला यावेळी तो गोव्याहून थेट अहमदाबादकडे रवाना झाला.

मुंबईचा आज गुजरातशी सामना 

सचिनचा मुलगा अर्जुन हा मुंबई इंडियन्स कडून खेळत असून आज त्याचा सामना गुजरात विरूद्ध अहमदाबाद येथील मैदानावर होणार असल्याने सचिन गुजरात कडे रवाना झाल्याचे सांगितले जाते. सचिन हा मुंबई इंडियन्सच्या मॅनेजिंग कमिटीचा सदस्य असून तो टिम सोबत असणे ही तेवढेच गरजेचे असल्याने सचिन अहमदाबादकडे रवाना झाल्याची माहिती.

Web Title: Sachin Tendulkar left for Ahmedabad from Goa directly to the ground after the birthday celebrations