शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

sindhudurg news: भरधाव डंपरने ५ महिलांना उडवले, एक ठार; मोलमजुरी करून निघाल्या होत्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 13:13 IST

काळसे होबळीचा माळ येथे झाला भीषण अपघात 

चौके : काळसे होबळीचा माळ येथे मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारा चंदगड येथील डंपर क्र. (एमएम ४६ एफ ०८२७) ने मोलमजुरी करून घरी जाणाऱ्या पाच महिलांना मागून जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सवा सहाच्या सुमारास घडली. या अपघातात काळसे रमाईनगर येथील रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (६५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.या भीषण अपघातात रुक्मिणी विठोबा काळसेकर (५५ ), अनिता चंद्रकांत काळसेकर (५५ ), प्रमिला सुभाष काळसेकर (४०), प्रज्ञा दीपक काळसेकर (३५) या चौघी जणी जखमी झाल्या आहेत. जखमी महिला रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.या अपघाताची माहिती मिळताच काळसे गावातील रहिवासी पोलिस उपिनिरीक्षक नितीन कदम आणि पोलिस पाटील विनायक प्रभू, राजेंद्र परब, अण्णा गुराम, प्रमोद काळसेकर यांच्या सह ग्रामस्थ घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यानंतर नितीन कदम यांनी मालवण पोलिस स्थानकात दूरध्वनीवरून अपघाताची माहिती दिली आणि १०८ रुग्णवाहिका बोलावून उपस्थितांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक विजय यादव, पोलिस उपनिरीक्षक झांजुर्णे यांच्यासह सुहास पांचाळ, राजन पाटील, सुहास शिवगण यांच्यासह अन्य पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातDeathमृत्यू