शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातून रांगणा गडावर जाण्यासाठी रोप-वे, वनविभागाकडून मागवला प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 17:30 IST

सिंधुदुर्गातून रांगणा गडावर जायचे असेल तर अडथळ्यांची शर्यत पार करत पायी जावे लागते. वनविभागाच्या अडथळ्यांमुळे सिमेंटच्या पायऱ्याही करणे शक्य नसल्याने शासन आता रोप-वे चा विचार करत आहे.

अनंत जाधवसावंतवाडी : कोल्हापूरसिंधुदुर्गच्या सीमेवर असलेल्या रांगणा किल्यावर शिवभक्तासह पर्यटकांना ये जा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग रोप-वे करण्याच्या विचारात आहे. तसा प्रस्ताव सिंधुदुर्ग वनविभागाकडून मागविण्यात आल्याची माहिती समोर आली असून याला सिंधुदुर्ग वनविभागाने ही दुजोरा दिला आहे. सिंधुदुर्गातून रांगणा गडावर जायचे असेल तर अडथळ्यांची शर्यत पार करत पायी जावे लागते. वनविभागाच्या अडथळ्यांमुळे सिमेंटच्या पायऱ्याही करणे शक्य नसल्याने शासन आता रोप-वे चा विचार करत आहे.कोल्हापूर व सिंधुदुर्गच्या सीमेवर असलेल्या ऐतिहासिक अशा रांगणा किल्यावर शिवभक्तासह पर्यटकांची संख्या वाढली आहे. जास्तीत जास्त पर्यटक हे कोल्हापूर जिल्ह्यातून थेट वाहन घेऊन गडावर जातात. त्यामुळे शिवप्रेमी यांचा आनंद घेत असतात. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रांगणा किल्यावर जायचे झाले तर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून किल्यावर जावे लागते.कुडाळ नेरूर मधून हा रस्ता असून त्या रस्त्याने एक व्यक्तीच पायी चालत जाऊ शकते. आजू बाजूला दरी असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक जण किल्यावर जायचे असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील मार्ग निवडतात. त्यामुळे अनेक पर्यटक तसेच शिवभक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गडावर जाण्यासाठी शासनाकडून प्रयत्न झाले पाहिजेत अशी मागणी करत होते.आता या मागणीला यश येताना दिसत आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने रांगणा किल्यावर जाण्यासाठी रोप वे करण्यासाठी पुढाकार घेतला असून तसा प्रस्ताव सिंधुदुर्ग वनविभागाकडून मागविण्यात आला आहे. मात्र अद्याप हा प्रस्ताव वनविभागाकडून पाठवण्यात आला नसून जर रांगणा किल्यावर सिंधुदुर्ग जिल्हयाच्या हद्दीतून रोप वे करायचा झाल्यास केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.मात्र अशा प्रकारे रोप वे झाल्यास रायगड किल्यानंतरचा रांगणा हा राज्यातील दुसरा किल्ला असणार आहे. तसेच गडप्रेमी बरोबरच पर्यटकांची संख्या ही वाढण्यास मदत होणार आहे.

रांगणा किल्यावर रोप-वे साठी प्रस्ताव मागवला असून आम्ही तसा प्रस्ताव पाठवला. यावर दोन ते तीन दिवसापूर्वीच चर्चा झाल्याचे सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगडkolhapurकोल्हापूर