शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्ग शहरात रस्त्यांचे बनले तळे

By admin | Updated: July 7, 2015 20:58 IST

बांधकाम विभागाचा गलथान कारभार : ग्रामस्थांतून तीव्र संताप

दोडामार्ग : पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा, रस्त्यांची दुरवस्था होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दोडामार्ग शहरात गटार खोदले खरे; परंतु ते अर्धवट स्थितीत ठेवल्याने गटारातील पाणी रस्त्यावरच येऊन रस्त्यांनाच तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचा फटका पादचारी आणि दुचाकीस्वारांना बसत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोडामार्ग शहरातील कोलमडलेली गटार व्यवस्था नेहमीच शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरली आहे. ग्रामपंचायत व्यवस्थापन आणि बांधकाम विभाग यांच्यात समन्वय नसल्याने शहरातील गटार व्यवस्थेचे दरवर्षी तीनतेरा वाजतात. गटारांची साफसफाई करावी तरी कोणी? असा प्रश्न ग्रामपंचायत आणि बांधकाम विभागाच्या वादामुळे नेहमीच निर्माण होतो. मात्र, चालूवर्षी ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच संंतोष नानचे यांनी बांधकाम विभागाची चांगलीच कानउघडणी केल्यानंतर गटार साफसफाईच्या कामास सुरुवात झाली. दरम्यान, पावसाने सुरुवात केल्याने गटारातील पाणी पुन्हा एकदा दूरध्वनी केंद्रासमोरील रस्त्यावर येत असल्याने याठिकाणी पाण्याची तळी साचून आहेत. त्याचा फटका पादचारी, रस्त्याने चालत जाणारे शाळकरी विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांना बसत आहे. एखादे मोठे वाहन गेल्यास रस्त्यावरील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडते आणि त्यांना नाहक भिजावे लागते. यामुळे या रस्त्यांवर वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाच्या या हलगर्जीपणाचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. गटार खुदाईचे काम अर्धवटबाजारपेठेतील गटारांची पावसाळ्यापूर्वीच साफसफाई करण्यात आली. मात्र, दोडामार्ग-आयी व दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गाच्या दुतर्फा शहर हद्दीत येणाऱ्या गटारांची खुदाई करण्याचे काम राहून गेले होते.आठ-दहा दिवसांपूर्वीच हे काम हाती घेण्यात आले. जेसीबी मशीनच्या सहाय्याने दोडामार्ग-आयी राज्यमार्गाच्या दुतर्फा गटार खुदाई करण्यात आली. येथील दूरध्वनी केंद्र ते धाटवाडीपर्यंत गटार खुदाई झाल्यानंतर गटार खुदाईचे काम संबंधितांकडून अर्धवट सोडून देण्यात आले.