शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियान सर्वांच्या सुरक्षेसाठी :डी. बी. म्हालटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 13:10 IST

Traffic Sindhudurg-शासनाचे रस्ता सुरक्षा अभियान हे सर्वांच्या सुरक्षेसाठी आहे. वाहतूक शाखा व आरटीओ कर्मचारी केवळ आपला महसूल गोळा करण्यासाठी कारवाई करीत नाहीत. ते वाहन चालकांच्या सुरक्षिततेला महत्त्व देत असतात. त्यामुळे केवळ दंड होणार म्हणून वाहतूक नियम पाळू नका, तर आपल्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन करा, असे सांगतानाच, नागरिकांनी हिट अँड रन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी ओरोस फाटा येथे आयोजित रस्ता सुरक्षा अभियानात मार्गदर्शन करताना केले.

ठळक मुद्देरस्ता सुरक्षा अभियान सर्वांच्या सुरक्षेसाठी :डी. बी. म्हालटकर ओरोस फाटा येथे रिक्षा चालक, वाहन चालकांसाठी मार्गदर्शन

ओरोस : शासनाचे रस्ता सुरक्षा अभियान हे सर्वांच्या सुरक्षेसाठी आहे. वाहतूक शाखा व आरटीओ कर्मचारी केवळ आपला महसूल गोळा करण्यासाठी कारवाई करीत नाहीत. ते वाहन चालकांच्या सुरक्षिततेला महत्त्व देत असतात. त्यामुळे केवळ दंड होणार म्हणून वाहतूक नियम पाळू नका, तर आपल्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन करा, असे सांगतानाच, नागरिकांनी हिट अँड रन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी ओरोस फाटा येथे आयोजित रस्ता सुरक्षा अभियानात मार्गदर्शन करताना केले.शासनाच्यावतीने जिल्ह्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे यांच्यावतीने ओरोस फाटा बॉक्सवेल येथे रिक्षा चालक, वाहन चालक आणि नागरिक यांच्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी जिल्हा पोलीस उपअधीक्षक (गृह) संध्या गावडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत, सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले, रिक्षा चालक, नागरिक आदी उपस्थित होते.यावेळी वाहतूक नियमांबाबत वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना वाहतूक नियम मार्गदर्शन पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी आरटीओ राजेंद्र सावंत म्हणाले, राज्यात होणारे अपघात हे वाहतूक नियम मोडल्याने होत आहेत. रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. त्यावर नियंत्रण आणण्यास शासन दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविते. मृत्यूशी टाळायची असेल भेट, तर दुचाकी चालवताना घाला हेल्मेट हे ब्रीदवाक्य यावर्षी निश्चित केले आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीsindhudurgसिंधुदुर्ग