शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातील भरावामुळे पाणी भरण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 18:25 IST

महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना ठेकेदार कंपनीने जानवली पुलाजवळ नदीपात्रात मातीचा भराव केला आहे. सध्या जोरदार पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्रातील पाणी वाढत आहे. यापुढेही पावसाचा जोर कायम राहिल्यास कलमठ महाजनीनगरमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनदीपात्रातील भरावामुळे पाणी भरण्याचा धोकाकलमठ महाजनीनगरमधील रहिवासी चिंतातूर

कणकवली : महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना ठेकेदार कंपनीने जानवली पुलाजवळ नदीपात्रात मातीचा भराव केला आहे. सध्या जोरदार पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्रातील पाणी वाढत आहे. यापुढेही पावसाचा जोर कायम राहिल्यास कलमठ महाजनीनगरमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कणकवली तालुक्यात पावसाने जोर केला आहे. त्यामुळे नदी, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. जानवली नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यातच महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत जानवली नदीवर पूल बांधण्यात येत आहे. त्यासाठी नदीपात्रात ठेकेदार कंपनीने मातीचा भराव केला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी बाहेर पडणार असून ते कलमठ महाजनीनगरमध्ये घुसण्याची दाट शक्यता मंगळवारी सायंकाळी निर्माण झाली होती.त्यामुळे त्या परिसरातील रहिवासी चिंतातूर झाले होते. दरम्यान, याबाबत माहिती समजताच तहसीलदार रमेश पवार, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, नागावकर यांनी जानवली पुलाजवळ जाऊन पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री, ऋषिकेश कोरडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.जानवली पुलाच्या कामाबाबत खबरदारी आवश्यकजानवली पुलाचे सध्या काम सुरू असून अर्धा स्लॅब घालण्यात आला आहे. हा स्लॅब घालताना त्याला देण्यात आलेले ह्यसपोर्टह्ण पावसाच्या पाण्यामुळे हलले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्या कामाची तांत्रिकदृष्ट्या पाहणी करूनच पुढील काम करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसhighwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग