शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 16:20 IST

ncp, jayantpatil, sindhududurg राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी खारेपाटण येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. बऱ्याच कालावधीनंतर राष्ट्रवादीचे नेते जिल्ह्यात दाखल झाले. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देखारेपाटण येथे जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत निवेदन देण्यासह भावना व्यक्त

कणकवली/ खारेपाटण : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी खारेपाटण येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. बऱ्याच कालावधीनंतर राष्ट्रवादीचे नेते जिल्ह्यात दाखल झाले. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, काका कुडाळकर आणि जिल्हा कार्यकारिणी व पदाधिकारी उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री जयंत पाटील यांचे स्वागत केले. 

कणकवली येथे राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबीद नाईक, जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, तालुकाध्यक्ष राजू पावसकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, प्रांतिक सदस्य विनोद मर्गज, देवेंद्र पिळणकर, युवक जिल्हा सदस्य जयेश परब, सुंदर पारकर, डॉ. अभिनंदन मालंडकर, सुधाकर कर्ले, तालुका उपाध्यक्ष मंगेश दळवी, राजेश पाताडे, इम्रान शेख, दिलीप वर्णे, अमित केतकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सावळाराम अणावकर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना बांधणी करीत असताना आता राज्य पातळीवर त्याला चांगला पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा दौरा झाला होता.नांदगाव तिठा येथे अल्पसंख्याक सेलच्यावतीने स्वागतराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नांदगाव तिठा येथे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रज्जाक बटवाले यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आसिफ बटवाले, मुजफ्फर बटवाले, रफिक जेठी, अब्दुल नावलेकर, आलिम बटवाले, शाहरूख बोबडे, मोसिम बटवाले, अब्दुल पाटणकर, अरमान बटवाले, अरबाज बटवाले रमजान नावलेकर आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नळयोजनेचे काम पूर्ण करा : राऊतखारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. खारेपाटण येथील अर्धवट स्थितीत असलेली मुखमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत मंजूर झालेल्या खारेपाटण नळयोजनेबाबत लेखी निवेदन दिले. खारेपाटण नळयोजनेचे अपूर्ण काम ठेकेदारावर कारवाई करून पूर्ण करून देण्याबाबत राऊत यांनी मंत्री पाटील यांच्याकडे विनंती केली. 

टॅग्स :PoliticsराजकारणJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसsindhudurgसिंधुदुर्ग