शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

सिलिका वाळूचे ११ ट्रक महसूलने घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 11:45 AM

Sand Kankavali Sindhudurg- कणकवली तालुक्यातील कासार्डे परिसरात अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ५ तर ओव्हरलोड वाळू वाहतूक करणारे ६ असे एकूण ११ ट्रक महसूल विभागाने बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले आहेत. या ट्रकवर आता महसूल विभागाकडून काय कारवाई होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ठळक मुद्देकासार्डे परिसरात कारवाई दंडात्मक कारवाई होऊन देखील वाळूमाफियांना धाक नसल्याचे झाले स्पष्ट

कणकवली : तालुक्यातील कासार्डे परिसरात अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ५ तर ओव्हरलोड वाळू वाहतूक करणारे ६ असे एकूण ११ ट्रक महसूल विभागाने बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले आहेत. या ट्रकवर आता महसूल विभागाकडून काय कारवाई होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.कासार्डे येथील मायनिंगवर महसूल विभागाने कारवाई करून देखील वाळू उत्खनन आणि अनधिकृत वाळू वाहतूक बंद होण्याचे नाव घेत नाही.जिल्हाधिकारी ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत याबाबत तक्रारी होऊन देखील वाळूमाफिया बिनदिक्कतपणे वाळू उपसा करून अनधिकृत वाहतूक करत असल्याचे बुधवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले.सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही वाळू वाहतूक स्थानिक ग्रामस्थांनी रोखून महसूल विभागाला याबाबत कल्पना दिली. त्यानंतर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी जात ते वाळूचे ट्रक ताब्यात घेतले. यात अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ५ तर ओव्हरलोड वाळू वाहतूक करणारे ६ अशा एकूण ११ ट्रकचा समावेश होता. हे सर्व ट्रक कणकवली तहसील कार्यालय परिसरात आणून उभे करण्यात आले आहेत.या ताब्यात घेतलेल्या ट्रक मध्ये क्रमांक (एम.एच. ०९ ए .एम.३८००), एम. एच.०२ वाय.ए.९८८१ ) , ( एम. एच. १० ए.क्यू. ४५१९ ),( एम.एच. ०८ एच.१२१३),( एम. एच. ०८ एल. ओ.९७०० ), ( एम.एच .०९ सी. यू .३२९९) , ( एम.एच. १२ डी. जी. ६८७८ ), ( एम.एच. ०९ सी. यू. ८२२४ ) , ( एम. एच. ०९ एफ. एल. ७२७७) , ( एम. एच. ०९ बी. सी. ४९७७ ) , ( एम. एच.०९ एफ. एल. ३८०० ) यांचा समावेश आहे.दरम्यान, संबधित ट्रक मधील वाळूची मोजमापे घेत गुरुवारी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली. या कारवाईकडे आता तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागूण राहिले आहे. 

टॅग्स :sandवाळूKankavliकणकवलीTahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग