शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उत्खननाच्या ठिकाणी महसूल विभागाचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 17:36 IST

Sand Tahsildar Vengurla Sindhudurgnews- वेंगुर्ला तालुक्यातील रेडी खाडीत तरवाडी, पिळणकरवाडी, सौदागरवाडी येथे गेले अनेक महिने रात्रीच्या वेळी अवैध, वारेमाप वाळू उत्खनन व वाहतूक सुरू होती. यावर ४ मार्च रोजी महसूल विभागाने छापा टाकला. मात्र याबाबत त्यांना सुगावा लागल्याने तेथे वाळू काढायच्या होड्या किंवा कामगार सापडले नाहीत; परंतु तेथे कामगारांसाठी बांधलेली झोपडी, वाळू काढण्यासाठी तयार केलेले तुटलेले रॅम्प दिसून आले. त्याची पंचयादी बनविल्याने वाळू काढणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देवाळू उत्खननाच्या ठिकाणी महसूल विभागाचा छापारेडी खाडीत वर्षापासून अवैध वाळू उत्खनन सुरू

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील रेडी खाडीत तरवाडी, पिळणकरवाडी, सौदागरवाडी येथे गेले अनेक महिने रात्रीच्या वेळी अवैध, वारेमाप वाळू उत्खनन व वाहतूक सुरू होती. यावर ४ मार्च रोजी महसूल विभागाने छापा टाकला. मात्र याबाबत त्यांना सुगावा लागल्याने तेथे वाळू काढायच्या होड्या किंवा कामगार सापडले नाहीत; परंतु तेथे कामगारांसाठी बांधलेली झोपडी, वाळू काढण्यासाठी तयार केलेले तुटलेले रॅम्प दिसून आले. त्याची पंचयादी बनविल्याने वाळू काढणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.रेडी खाडीत मागील एक वर्षापासून स्थानिक वाळू तस्करांकडून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू होते. याबाबत त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने महसूल अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी, मंडल अधिकारी, पोलीस व तलाठी यांना वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली.

यावेळी शिरोडा येथील मंडल अधिकारी भानुदास चव्हाण, शिरोडा तलाठी फिरोज खान, रेडी तलाठी सोळंखी, रेडी कोतवाल कनयाळकर, गांधीनगर कोतवाल परब, रेडी पोलीस नाईक, आदी उपस्थित होते. यापुढे रेडी खाडीत अवैध वाळू उत्खनन व वाळू वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या आदेशान्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी सांगितले. या संयुक्त कारवाईमुळे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार वेंगुर्ला प्रवीण लोकरे यांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले असल्याचे संस्थेचे सीईओ राजन रेडकर यांनी सांगितले.रेडी येथील वाळू कारवाईप्रसंगी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :sandवाळूVengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्गTahasildarतहसीलदार