सावंतवाडी : येथील तहसील कार्यालयाच्या विशेष पथकाने बुधवारी बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डंपरवर कारवाई केली. यात दोन वाळूचे डंपर तर दोन खडी पावडरच्या डंपरचा समावेश आहे. चारही डंपर जप्त करून येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवले आहेत. अशी माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.येथील महसूल विभागाकडून अलीकडे ओव्हरलोड तसेच अनधिकृत वाहतूक करणाऱ्या डंपरवर धडक कारवाई सुरू आहे. गेल्या महिन्याभरात जवळपास दहा डंपरवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली.आज पुन्हा एकदा दिवसभरात विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये झाराप-पत्रादेवी बायपास महामार्गावर वाळूचे डंपर तर बांदा, विलवडे परिसरांमध्ये पावडर वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करण्यात आली. संबंधित डंपर चालकांना नोटीस बजावली आहे.
महसूलची सावंतवाडीत चार डंपरवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 16:40 IST
sand Sawantwadi Sindhudurg- सावंतवाडी येथील तहसील कार्यालयाच्या विशेष पथकाने बुधवारी बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या चार डंपरवर कारवाई केली. यात दोन वाळूचे डंपर तर दोन खडी पावडरच्या डंपरचा समावेश आहे. चारही डंपर जप्त करून येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवले आहेत. अशी माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.
महसूलची सावंतवाडीत चार डंपरवर कारवाई
ठळक मुद्देमहसूलची सावंतवाडीत चार डंपरवर कारवाईसंबंधित डंपर चालकांना नोटीस