शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: बँकेत अधिकारी असल्याची बतावणी, कमी किंमतीत मोटार देतो म्हणाला; सेवानिवृत्त अभियंत्याला पावणे पाच लाखांचा गंडा घातला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 17:24 IST

संशयिता विरोधात गुन्हा दाखल 

कणकवली : कणकवली शहरातील एका लॉजमध्ये झालेल्या ओळखीनंतर विश्वास संपादन करत आपण एका राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी असल्याची बतावणी करत गाड्यांच्या लिलावातील मोटार कमी किमतीत घेवून देतो असे सांगत एका वृध्द सेवानिवृत्त अभियंत्याची ४ लाख ८० हजार रोख रक्कम घेवून फसवणूक केली. याप्रकरणी संशयित प्रियंक एस. आंगणे (५०, रा. आंगणेवाडी) याच्यावर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ११ ते १८ मार्च २०२५ दरम्यान घडली. याबाबत रतनकुमार मनोज सावंत (वय-७४,रा. भिरवंडे, बिवणेवाडी, सद्या रा.नवी मुंबई) यांनी तक्रार दिली आहे. याबाबत माहिती अशी की, रतनकुमार सावंत हे सेवानिवृत्त अभियंता असून त्यांची वैभववाडी-जांभवडे येथे शेतजमिन आहे. ते शेतीच्या कामासाठी गावी येतात. १० मार्च रोजी ते गावी आले होते. त्यावेळी त्यांची संशयित प्रियंक आंगणे याच्याशी ओळख झाली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबईत मुख्य कार्यालयात आपण प्रशिक्षणार्थी अधिकारी आहे असेही सांगितले.  त्यावेळी सावंत यांनी आपल्याला मोटारीची आवश्यकता असल्याचे त्याला सांगितले. त्यावर संशयित आंगणे याने बँकेचे कर्ज थकलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्री लिलावामध्ये तुम्हाला कमी किमतीत गाडी घेवून देतो असे सांगितले. त्यानंतर सावंत यांनी आंगणे याला ३ लाख ९० हजार रुपये दिले. त्यानंतर आणखी पैसे लागतील असे सांगितल्यानंतर  ९० हजार रुपये असे एकूण ४ लाख ८० हजार रुपये दिले.त्याने या गाड्यांचा लिलाव वाशी डेपो येथे केला जातो, तेथे तुम्हाला गाडी घेण्यासाठी बोलवेन असे सांगून तो मुंबईला निघून गेला. त्यानंतर सावंत यांनी आंगणे याला वारंवार फोनद्वारे आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधून गाडीबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने कारणे सांगून टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रतनकुमार सावंत यांनी कणकवली पोलिस ठाण्यात प्रियंक आंगणे याच्याविरुध्द तक्रार दिली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.