शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
3
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
4
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
5
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
6
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
7
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
8
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
9
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
10
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
11
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
12
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
13
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
14
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
15
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
16
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
17
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
18
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
19
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
20
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga: कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर, सरपंच पदासाठी इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी

By सुधीर राणे | Updated: April 8, 2025 16:54 IST

कणकवली : कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीची सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत आज, मंगळवारी काढण्यात ...

कणकवली : कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीची सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत आज, मंगळवारी काढण्यात आली. रोटेशननुसार हे आरक्षण जाहीर झाल्यावर सरपंच पदासाठी इच्छूक असलेल्या अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.तालुक्यातील ६४ पैकी ३३ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यात अनुसूचित जातीसाठी  ५ ग्रामपंचायती राखीव असून त्यातील ३ महिलांसाठी, नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी १७ ग्रामपंचायती असून त्यातील ९ महिलांसाठी तर खुल्या प्रवर्गातील ४२ पैकी २१ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी. एल.सभागृह मंगळवारी  रितेश पाटील व भार्गवी केळुसकर या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी उचलून आरक्षण सोडत काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे, निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव, संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार गंगाराम कोकरे,संभाजी खाडये,सत्यवान माळवे,राणे, मंडळ अधिकारी नागावकर आदी यावेळी उपस्थित होते. सनियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)आरती देसाई यांनी सोडत सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली. आरक्षण पुढील प्रमाणे अनुसूचित जातीसाठी ५ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. त्यापैकी अनुसुचित जाती महिलांसाठी नवीन कुर्ली, पिसेकामते, वाघेरी तर अनुसुचित जाती प्रवर्गासाठी शिरवल व  दारिस्ते ग्रामपंचायत आरक्षित झाली आहे.या ग्रामपंचायती आरक्षित करताना गावातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचा आधार घेण्यात आला आहे.नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १७ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. यापैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी ९ जागा आहेत. त्यामध्ये कलमठ, ओझरम, लोरे नंबर १, वागदे, खारेपाटण,  हरकुळ बुद्रुक, तरंदळे, साकेडी,चिंचवली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ८ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या असून नडगीवे, ओटव, ओसरगाव, कासार्डे, वरवडे, फोंडाघाट, बोर्डवे,आयनल यांचा समावेश आहे.सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. त्यात सर्वसाधारण महिलांसाठी  २१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामध्ये असलदे, कळसुली, कसवण - तळवडे, कुरंगवणे -बेर्ले, कोंडये, कोळोशी, डामरे, तळेरे, तीवरे, नांदगाव, पियाळी, हरकुळ खुर्द, भरणी, नाटळ, जानवली, शिडवणे, नरडवे, आशिये, बेळणे खुर्द, घोणसरी, साळीस्ते या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये करंजे, करूळ, कासरल, कुंभवडे, गांधीनगर, तोंडवली -बावशी, दारोम, दिगवळे, नागवे, बिडवाडी, भिरवंडे, माईण, वायंगणी, वारगाव, शेर्पे, शिवडाव, सांगवे, सातरल, हळवल ,हुंबरठ, सावडाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचreservationआरक्षण