शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

हीच का उपकाराची परतफेड? नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 17:22 IST

शासनाच्या हलगर्जीपणामुळे व अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे आतापर्यंत सिंधुदुर्गात तब्बल ८६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देशासनाच्या हलगर्जीपणामुळे व अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे आतापर्यंत सिंधुदुर्गात तब्बल ८६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात हॉस्पिटल आहेत; पण डॉक्टर नाहीत, बेड नाहीत, ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा आहे

मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि एकेकाळचे निष्ठावंत शिवसैनिक असेलल्या नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा टीका केली आहे. कोरोना काळात सिंधुदुर्गावर वैद्यकीय सुविधा पुरविण्यात अन्याय झाल्याचा आरोप राणेंनी केला आहे. राणे यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. कोलगाव ग्रामपंचायततर्फे तयार करण्यात आलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय विलगीकरण कक्षाचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले.   

शासनाच्या हलगर्जीपणामुळे व अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे आतापर्यंत सिंधुदुर्गात तब्बल ८६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात हॉस्पिटल आहेत; पण डॉक्टर नाहीत, बेड नाहीत, ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा आहे. दातांचे व त्वचेचे डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. याची राज्य शासनाला लाज कशी वाटत नाही, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे. तसेच, शिवसेनेला स्थापनेपासून साथ देणाऱ्या सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या पदरी मृत्यू, हीच का उपकाराची परतफेड? असा सवालही राणेंनी मुख्यमंत्र्यांना केला.  सिंधुदुर्ग-रत्नागिरीने शिवसेनेला स्थापनेपासून साथ केली, त्याबदल्यात शिवसेनेने कोरोना काळात सिंधुदुर्गात ९०१ तर रत्नागिरीमध्ये १५६१ मृत्यु दिले. याला संपूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत. दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?, असे राणेंनी ट्विटरवरुन म्हटलंय. 

आरोग्य कर्मचारी पुरविण्याची सूचना

राणे म्हणाले, जिल्ह्याची आरोग्यव्यवस्था अत्यंत बिकट आहे. अनेक रुग्णांचे बळी जात आहेत, तर काहीजण अत्यवस्थ आहेत. याबाबत आपलं राज्याच्या आरोग्य सचिवांशी सकाळीच बोलणं झालं. त्यावेळी त्यांच्याशी मी विस्तृत चर्चा करून जिल्ह्यातील रुग्णालयांना फिजिशियन, डॉक्टर, नर्स व इतर आरोग्य कर्मचारी पुरविण्यासंदर्भात सूचना केल्या. त्यानुसार त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्वरित देण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्री