नैसर्गिक साधन संपत्तीव्दारे उत्पन्न वाढीसाठी रिमोट सेसिंग मॅपिंग महत्वाचे : केसरकर
By Admin | Updated: June 16, 2017 17:15 IST2017-06-16T17:15:34+5:302017-06-16T17:15:34+5:30
सिंधुदुर्गनरीत महाराष्ट्र रिमोट सेसिंग अॅप्लीकेशन सेंटरच्या कार्यशाळेचे उद्घाटन

नैसर्गिक साधन संपत्तीव्दारे उत्पन्न वाढीसाठी रिमोट सेसिंग मॅपिंग महत्वाचे : केसरकर
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. १७: नैसर्गिक साधन संपत्तीचा उत्पन्न वाढीसाठी पुरेपुर वापर व्हावा, या दृष्टिकोनातून रिमोट सेसिंगव्दारे मॅपिंग करणे महत्वाचे आहे. महाराष्ट्र सुंदर संवेदन उपयोजना केंद्र (नागपूर) (एमआरसॅक) या संस्थेव्दारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रिमोट सेसिंगव्दारे मॅपिंग हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने सर्व शासकीय विभागानी या चर्चासत्रामध्ये मिळणाऱ्या माहितीचा लाभ घेऊन आपले विभागाचे अचूक व योग्य माहिती पुरवावी असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.
सिंधुदुर्गनरीतील जिल्हा नियोजन समितीच्या नविन सभागृहात एमआरसॅक म्हणजे महाराष्ट्र रिमोट सेसिंग अॅप्लीकेशन सेंटरच्या वतीने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संचालक दास, सेंटरचे शास्त्रज्ञ डॉ. घारे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चांदा ते बांदा हा शासनाचा १४२ कोटी रुपयांचा महत्वकांक्षी उपक्रम सुरु आहे. या दृष्टीने जिल्ह्यात उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीची अचूक माहिती आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्याचे रिमोट सेसिंग मॅपिंग करण्यात येत असल्याचे स्पष्ट करुन केसरकर म्हणाले की, पर्यटन, कृषी, फलोद्यान, मत्स्यव्यवसाय पशुसंवर्धन, क्रीडा विकास, रस्ते विकास, पाणी पुरवठा, दुग्धविकास आदी सर्व विभागाशी संबंधीत अद्ययावत माहिती उपलब्ध होण्याबरोबरच जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्ती कुठे व कशाप्रकारे उपलब्ध आहे, याचीही माहिती या मॅपिंग कार्यक्रमामुळे उपलब्ध होणार आहे. अधिकाऱ्यांनी अतिशय तन्मयतेने या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन कार्यशाळेचा हेतू विशद केला. संचालक दास यांनी माहिती कोणत्या प्रकारची व कशा पध्दतीने अपलोड करावयाची याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस सर्व शासकीय खाते प्रमुख उपस्थित होते.