शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वेंगुर्ले तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद, सिंधुदुर्गात पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 17:12 IST

कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्प ६२ टक्के भरला असून या धरणाच्या विमोचकातून सध्या ३४.७७ घनमीटर प्रति सेकंद विसर्ग सुरू आहे. सध्या या धरणात ६०.७७४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.

ठळक मुद्देवेंगुर्ले तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद, सिंधुदुर्गात पावसाची संततधारदेवघर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू

सिंधुदुर्गनगरी : कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्प ६२ टक्के भरला असून या धरणाच्या विमोचकातून सध्या ३४.७७ घनमीटर प्रति सेकंद विसर्ग सुरू आहे. सध्या या धरणात ६०.७७४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.

या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ८४.४० मिलीमीटर इतका पाऊस झाला असून १९४०.३० मिलीमीटर एकूण पाऊस झाला आहे. यावर्षी घळभरणी झालेल्या अरुणा प्रकल्पामध्ये ४०.८५ टक्के पाणीसाठा झाला असून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत १४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत २०२०.२० मिलीमीटर एकूण पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत वेंगुर्ले तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २२७.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.नाधवडे, सनमटेंब व तिथवली लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून नाधवडेत ९७.९२ टक्के, सनमटेंब - ९५.८२ टक्के आणि तिथवली - ८०.६२ टक्के आहे. ओझरम लघु पाटबंधारे प्रकल्पातून १८.५९ घनमीटर प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. तिलारी आंतरराज्य प्रकल्प ७५.७८ टक्के भरला असून धरणात सध्या ३३९.००८० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात २७.४० मिलीमीटर पाऊस झाला असून १८९९.६० मिलीमीटर एकूण पाऊस झाला आहे.सरासरी गतवर्षीपेक्षा ५७९ मिलीमीटरने घटली१ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी १६०५ मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यात सरासरी २१८४.७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ८७.२ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग ८३ (१८०३), सावंतवाडी ४५ (१३५९), वेंगुर्ले २२७.६ (१८३७.०४), कुडाळ ८८ (१५९३), मालवण ४७ (१३१३), कणकवली ११४ (१८४४), देवगड १८ (१२५६), वैभववाडी ७५ (१८४३) असा पाऊस झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग