पाच लाखांपेक्षा जास्त विक्रमी पर्यटकांची किल्ले सिंधुदुर्गला भेट, पावसामुळे पाच दिवस आधीच पर्यटन हंगामाला ब्रेक

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 27, 2025 17:39 IST2025-05-27T17:39:15+5:302025-05-27T17:39:44+5:30

मालवण बंदर विभागाची माहिती 

Record number of tourists visit Sindhudurg Fort Rains bring tourist season to a halt five days early | पाच लाखांपेक्षा जास्त विक्रमी पर्यटकांची किल्ले सिंधुदुर्गला भेट, पावसामुळे पाच दिवस आधीच पर्यटन हंगामाला ब्रेक

पाच लाखांपेक्षा जास्त विक्रमी पर्यटकांची किल्ले सिंधुदुर्गला भेट, पावसामुळे पाच दिवस आधीच पर्यटन हंगामाला ब्रेक

मालवण : ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गला २०२४-२५ या पर्यटन हंगामात तब्बल ५ लाख १५ हजार ८०६ एवढ्या विक्रमी संख्येने पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती मालवण बंदर विभागाने दिली आहे. यंदा पर्यटन हंगामाच्या अखेरचे पाच दिवस अवकाळी पावसामुळे वाया गेले, अन्यथा हा आकडा साडे पाच लाखांच्या पुढे गेला असता.

केंद्र सरकारच्या इनलॅंड व्हेसल ॲक्ट १९१७ नुसार १ सप्टेंबर ते २५ मेपर्यंतचा कालावधी सागरी जलपर्यटनासाठी ठरवून देण्यात आला आहे. मालवणमध्ये सप्टेंबर ते मे महिना या पर्यटन हंगामात मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. यामध्ये सागरी जलपर्यटनाची मुदत २५ मेपर्यंत होती. पावसाळी कालावधीसाठी २६ मेपासून सर्वप्रकारचे जलपर्यटन बंद करण्यात यावे, अशी नोटीस बंदर विभागाने व्यावसायिकांना बजावली होती.

सन २०२२-२३ च्या पर्यटन हंगामात एकूण ३ लाख ३६ हजार ७६५ पर्यटकांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर हजेरी लावली. यात ३ ते १२ वयोगटातील ३६ हजार, तर त्यापुढील वयोगटातील ३ लाख ७६५ पर्यटकांचा समावेश होता. २०२३-२४ च्या पर्यटन हंगामात किल्ला पाहण्यासाठी ४ लाख ३ हजार ३०९ पर्यटकांनी हजेरी लावली, मे महिन्यातील आकडेवारी सरासरी अंदाजात घेण्यात आली आहे.

२० मेपासूनच पर्यटनाला ब्रेक

मालवणात किल्ले राजकोट येथे नव्याने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सर्वांचे आकर्षण ठरल्याने राज्यभरातील पर्यटकांनी पुतळा पाहण्यासाठी गर्दी केली. मात्र २० मेपासून वादळी पाऊस झाल्याने जलपर्यटनाला ब्रेक लागला. मे २०२२ मध्ये ४५ हजार ३७३ मोठे, तर ३६९८ छोटे अशा एकूण ४९ हजार ७१ पर्यटकांची नोंद बंदर विभागाकडे झाली होती. २०२३ मे महिन्यात सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची संख्या ५७ हजार ६३१ आहे. २०२४ मे महिन्यात ८५ हजार ३२५ पर्यटकांनी भेट दिली. तुलनेत यंदा मे महिन्यात लहान ८७२०२ पर्यटकांनी भेट दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे दोन हजार पर्यटकांची वाढ झाल्याचे स्पष्ट होते.

एप्रिलमध्ये ३९,७०१ पर्यटकांनी दिली भेट

काही दिवसांची मुदतवाढ मिळाली असती, तर हा आकडा नक्कीच लाखापर्यंत पोहोचला असता एप्रिल २०२२ मध्ये मोठे पर्यटक २८,२५६, तर लहान पर्यटकांची संख्या १३४३ इतकी होती. एप्रिल २०२३ मध्ये मोठे ३५,५९१, तर लहान ८७० इतकी होती. एप्रिल २४ मध्ये ३० हजार मोठे, तर १४ हजार लहान पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले. एप्रिल २५ मध्ये ३९१२६ मोठे ५९५ लहान पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले.

Web Title: Record number of tourists visit Sindhudurg Fort Rains bring tourist season to a halt five days early

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.