शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

जनतेच्या माथी महामार्ग टोल मारण्याचा राऊत यांचा प्रयत्न : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 16:35 IST

Parshuram Uprkar, highway, mns, sindudurg महामार्ग ठेकेदारांकडून टक्केवारी खाऊन झाल्यावर आता टोलमधून मलिदा मिळविण्यासाठी खासदार विनायक राऊत यांना महामार्गाचे लोकार्पण करण्याची घाई झाली आहे. अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देजनतेच्या माथी महामार्ग टोल मारण्याचा राऊत यांचा प्रयत्न : परशुराम उपरकर अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी जनहित याचिका

कणकवली : महामार्ग ठेकेदारांकडून टक्केवारी खाऊन झाल्यावर आता टोलमधून मलिदा मिळविण्यासाठी खासदार विनायक राऊत यांना महामार्गाचे लोकार्पण करण्याची घाई झाली आहे. अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.महामार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे व या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी उपरकर म्हणाले, खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री आणि केंद्रीय वाहतूक मंत्री यांच्या उपस्थितीत महामार्गाचा लोकार्पण सोहळा केला जाईल अशी घोषणा केली. ही घोषणा हास्यास्पद आहे. येथील लोकांच्या अनेक समस्या आहेत. अद्यापही लोकांची नुकसान भरपाई मिळालेली नाही.किंबहुना महामार्गासंबंधी प्रश्न सुटण्यासाठी खासदार राऊत यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. मात्र, आपण लोकांसाठी काहीतरी करतोय हे दाखविण्यासाठी केवळ फोटोबाजी केली आहे.या पट्ट्यातील महामार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे व या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.मात्र, अद्याप काम सुरू झालेले नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ते झाराप या पट्ट्यातील दोन मोठे उड्डाणपुलाचे भाग कोसळले. याबाबत नोटिसीद्वारे या संबंधित प्रशासन व अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर तपास अधिकाऱ्याने संबंधित कंत्राटदारांनी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचे सामान वापरल्याचे अहवालात म्हटले आहे. तरीही त्यांच्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही, अशी माहिती ॲड. तेजस धांडे यांनी न्यायालयाला दिल्याचे उपरकर यांनी यावेळी सांगितले.काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होतेन्यायालयाने याप्रकरणी राज्य सरकारसह सर्व कंत्राटदारांना नोटीस बजावत २६ नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ही याचिका ॲड. तेजस धांडे यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली आहे. बुधवारी या याचिकेवरील सुनावणी न्या. के. के. तातेड व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. याचिकेनुसार, मुंबई-गोवा महामार्ग कंत्राटदारांना दिलेल्या नोटिसानुसार महामार्गाचे रत्नागिरी ते सिंधुदुर्ग पट्ट्यातील चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. तसा करार २०१७ मध्ये कंत्राटदारांबरोबर करण्यात आला होता.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसेhighwayमहामार्ग