शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार भाजपचाच, बाळासाहेब भेगडेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 16:05 IST

राज्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीचे सरकार आहे. या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल व कमळ चिन्हावरच तो उमेदवार लढेल

ओरोस : लोकसभा उमेदवार  हे भाजप पक्षाचे  पार्लमेंटरी बोर्ड ठरवत असते. राज्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युतीचे सरकार आहे. या मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल व कमळ चिन्हावरच तो उमेदवार लढेल अशी माहिती पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना लोकसभा प्रवास योजनेचे प्रभाग समन्वयक संजय ऊर्फ बाळासाहेब भेगडे यांनी सिंधूदुर्गनगरी येथील पत्रकार परिषदेत दिली.लोकसभा प्रवास योजनेमध्ये  महाराष्ट्रातील अठरा लोकसभा मतदारसंघांची निवड झाली आहे. त्यात रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामाला बळकटी देणे व सर्वसामान्य जनतेपर्यंत  पोहोचण्यासाठी बाळासाहेब भेगडे यांचा सिंधुदुर्ग-रत्नागिरी दौरा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी येथे प्रमुख भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक माध्यमिक पतपेढी सभागृहात झाली. तत्पूर्वी त्यानी जिल्हा मुख्यालयातील पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी समन्वय समितीचे साहाय्यक माजी आमदार प्रमोद जठार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजप नेते अतुल काळसेकर, भाजप सरचिटणीस  प्रभाकर सावंत,  संजू परब, महेश सारंग, धनंजय पात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.कार्यकर्ते, जनता यांच्याशी संवादभारतीय जनता पक्षाने राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून सेवा दिली आहे. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबविण्यात येतात या योजनांचा आढावा घेणे नागरिकांशी संवाद साधणे व भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करणे या उद्देशाने लोकसभा प्रवास योजनेत देशभरातील १६० लोकसभा मतदारसंघांची निवड झाली आहे. यात महाराष्ट्रातील १८ लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून त्यामध्ये  रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवरच आपला हा जिल्हा दौरा असून  भाजप कार्यकर्ते जनता यांच्याशी संवाद साधणे  हा यामागील प्रमुख उद्देश आहे.सर्वसामान्य जनतेसाठी चांगले काम करण्याचा प्रयत्नकेंद्रीय मंत्री  तसेच राज्य सरकार व केंद्र सरकार  याच्या माध्यमातून प्रत्येक भागात विविध विकासकामे व योजना राबविल्या जातात. सर्वसामान्य नागरिकांना याचा योग्य पध्दतीने लाभ मिळण्यासाठी संघटनात्मक पातळीवरही प्रयत्न होत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजप नेते व केंद्रीय मंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा प्रवास योजनेची ही यात्रा सुरू असून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी चांगल्यात चांगले काम करण्याचा प्रयत्न आहे, असेही यावेळी बाळासाहेब भेगडे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपा