वैभववाडी : स्वत:चा जीव धोक्यात घालून दोनशे फूट खोल दरीतून जखमी ट्रक चालकाला सुरक्षित बाहेर काढणारे पोलीस कर्मचारी संदीप राठोड यांचा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी बक्षिस देऊन गौरव केला. २५ ऑक्टोबरला करूळ घाटात झालेल्या या अपघातात चालक गंभीर जखमी झाला होता.कोल्हापूरहून गोव्याकडे मैदा घेऊन निघालेला ट्रक २५ ऑक्टोबरला गगनबावड्यापासून तीन किलोमीटर अंतरावर करूळ घाटात दोनशे फूट खोल दरीत कोसळला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेला श्रीकांत शशिकांत बिकट (५०) हा दरीत होता. अपघाताची माहिती मिळताच करूळ तपासणी नाक्यावर कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी राठोड अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. कशाचाही विचार न करता ते दोरखंडाच्या सहाय्याने दरीत उतरले. जखमी चालकाला धीर देत त्याला बाहेर काढण्याच्या दृष्टीने तातडीने हालचाल केली.दीड-दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला कोल्हापुरला उपचाराकरिता हलविण्यात आले. स्वतःचा जीव धोक्यात घालून चालकाचा जीव वाचविणाऱ्या राठोड यांच्या धाडसी कार्याची दखल पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी घेतली. त्यांनी राठोड यांना बक्षिस देऊन त्यांचा गौरव केला. वर्षभरापूर्वी राठोड यांनी दरीत झुकलेल्या एका अपघातग्रस्त ट्रकचालकाला फळीचा वापर करून सहीसलामत बाहेर काढले होते. त्यावेळीही तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी राठोड यांना गौरविले होते.सिंधु फोटो०१पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पोलीस शिपाई संदीप राठोड यांचा सत्कार केला.
पोलीस अधीक्षकांच्या हस्ते राठोड यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 15:07 IST
police, karul, vaibhavwadi, sindhudurgnews स्वत:चा जीव धोक्यात घालून दोनशे फूट खोल दरीतून जखमी ट्रक चालकाला सुरक्षित बाहेर काढणारे पोलीस कर्मचारी संदीप राठोड यांचा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी बक्षिस देऊन गौरव केला. २५ ऑक्टोबरला करूळ घाटात झालेल्या या अपघातात चालक गंभीर जखमी झाला होता.
पोलीस अधीक्षकांच्या हस्ते राठोड यांचा सत्कार
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांच्या हस्ते राठोड यांचा सत्कार करूळ घाटात कोसळलेल्या ट्रकच्या चालकाचा वाचविला होता जीव