शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तेरेखोल नदीत आढळले दुर्मीळ लेदरबॅक कासव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 17:34 IST

भारतात केवळ अंदमान-निकोबार बेटावर या 'लेदरबॅक' प्रजातीची कासवे विणीसाठी येतात.

कोल्हापूर : सिंधुदुर्गातील तेरेखोल नदीत मच्छीमाराच्या जाळ्यात अडकेलेले ‘लेदरबॅक’ हे जगातील सर्वात मोठे सागरी कासव अडकले होते. मच्छीमाराने या कासवाची जाळ्यातून सुटका करून पुन्हा त्याला समुद्रात सोडले. राज्याच्या सागरी क्षेत्रातील या कासवाची तिसऱ्यांदा छायाचित्राच्या रुपात नोंद झाली आहे.राज्याच्या सागरी क्षेत्रात ‘ऑलिव्ह रिडले’, ‘ग्रीन सी’, ‘हाॅक्सबिल’ तसेच ‘लाॅगरहेड’ असे चार प्रकारचे समुद्री कासवे आढळतात. यातील ‘ऑलिव्ह रिडले’ प्रजातीच्या माद्या दरवर्षी मोठ्या संख्येने कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये 'लेदरबॅक' प्रजातीच्या कासवाचेही दर्शन राज्याच्या समुद्रामध्ये हाेत आहे. भारतात केवळ अंदमान-निकोबार बेटावर या 'लेदरबॅक' प्रजातीची कासवे विणीसाठी येतात. महाराष्ट्रात १९८५ मध्ये मालवणजवळील देवबागच्या किनाऱ्यावर साडेचार फुटांचे 'लेदरबॅक' कासव आढळले होते. तशी नोंद 'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'कडे (सीएमएफआरआय) आहे; परंतु त्याचे छायाचित्र उपलब्ध झाले नव्हते.दरम्यान जून, २०१९ मध्ये रायगडमधील भरडखोल येथे मच्छीमाराच्या जाळ्यात हे कासव अडकले होते. त्यानंतर मार्च २०२१ मध्ये डहाणू समुद्र किनाऱ्यानजीकही 'लेदरबॅक' कासवाचे छायाचित्र मिळाले होते. त्यानंतर आता तेरेखोलनजीक समुद्रामध्ये या कासवाचा वावर आढळला आहे.तेरेखोल नदीच्या मुखाजवळ दि. २८ मे रोजी रुपेश महाकाळे हे मासेमारी करत होते. यावेळी काळ्या रंगाचे हे वेगळे कासव त्यांच्या जाळ्यात अडकलेले दिसले. त्यांनी तत्काळ जाळे कापून या कासवाची सुटका केली आणि त्याला पुन्हा समुद्रात सोडले. त्यांनी या घटनेचे मोबाइलमध्ये छायाचित्रण केले आहे. हे छायाचित्रण 'मँग्रोव्ह फाउंडेशन'ला पाठवले.उन्हाळ्यात होतेय स्थलांतरमहाराष्ट्रात पूर्वी आढळलेल्या लेदरबॅक कासवांच्या नोंदी या उन्हाळ्यात झाल्या आहेत. जून २०१९ मध्ये भरडखोल आणि मार्च २०२१ मधील पालघर जिल्ह्यातील नोंदही उन्हाळ्यातील आहे. त्यामुळे उन्हाळ्यातच सागरी परिक्षेत्रात ही कासवे स्थलांतर करत असावीत, असा अंदाज कासव संवर्धन करणाऱ्या संस्थांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग