शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राणेचं ट्विट, शिवसेनेचा इशारा, आता अप्पर पोलीस महासंचालक कणकवलीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 17:05 IST

उलट सुलट चर्चाना उधान; कडक पोलीस बंदोबस्त

ठळक मुद्देसध्या जिल्हा बँक निवडणुकीत जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना अटक करण्याचा डाव महाविकास आघाडीचे नेते करत असल्याचा आरोप केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग/कणकवली : राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल आणि कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे सोमवारी सकाळी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला भेट दिली. त्यामुळे नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चाना उधाण आले होते.

सध्या जिल्हा बँक निवडणुकीत जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना अटक करण्याचा डाव महाविकास आघाडीचे नेते करत असल्याचा आरोप केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. तर, आमदार नितेश राणे यानीही संतोष परब हल्ला प्रकरणात मला नाहक गोवण्याचा डाव सुरू असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे व संदेश उर्फ गोट्या सावंत याना अटक न केल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर शिवसेना मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे. 

या पार्श्वभूमीवर खुद्द अप्पर पोलीस महासंचालक कणकवलीत दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल हे प्रतिवर्षी डिसेंबर अखेर होणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी कणकवलीत दाखल झाले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सोमवारी सकाळी लवकर उपविभागीय पोलीस कार्यालयात दाखल होत त्यांनी माहिती घेत वार्षिक तपासणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांना भेट दिली. दरम्यान, रायगड तसेच इतर जिल्ह्यातून कणकवलीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस पथके दाखल झाली आहेत. तसेच अधिकारी, दंगल नियंत्रण पथकेही कणकवलीत असल्याने वातावरण काहीसे तणावपूर्ण बनले आहे. 

तपास सुरू !

कणकवली येथे झालेल्या संतोष परब हल्ल्याप्रकरणी पोलीस अजूनही गुप्तता पाळत असून जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सोमवरीही प्रसिद्धी माध्यमांना संबधित गुन्ह्याचा तपास सुरू आहे. सहा आरोपीना अटक केली आहे.  एवढीच माहिती दिली. इतर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस